नताशाने शेअर केला बाळासह फोटो, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 04:24 PM2020-08-12T16:24:49+5:302020-08-12T16:25:35+5:30

हार्दिक पांड्याने 1 जानेवारी 2020 रोजी नताशासह साखरपुडा केला होता. कोरोनाच्या संकटामुळे देश लॉकडाऊनमध्ये असताना हार्दिक आणि नताशाने देशवासियांना आपल्या पहिल्या मुलाच्या आगमनाची बातमी दिली होती.

natasa stankovic shared a Cute photo with baby | नताशाने शेअर केला बाळासह फोटो, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

नताशाने शेअर केला बाळासह फोटो, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

googlenewsNext

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टँकोव्हिच यांच्या जीवनात  बाळाचे  आगमन झाल्यापासून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.  त्याच्या आयुष्यातला हा सगळ्यात सुंदर काळ  आहे.  नताशाने पहिल्यांदाच आपल्या या लाडक्या बाळासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात नताशा बाळासह खेळताना दिसते. मायलेकाचं नातं काही वेगळंच असतं. आपल्या पोटच्या गोळ्यावर आईचं जीवापाड प्रेम असतं हेच या फोटोतून पाहायला मिळते.

हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल  झाला आहे.  त्याला समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे. प्रसिद्धी आणि झगमगाटाच्या दुनियेपासून दूर राहून नाताशा तिच्या बाळासह एन्जॉय करतेय.  30 जुलैला नताशाने बाळाला जन्म दिला होता.  सध्या आपल्या लेकासह नाता तिचे मातृत्व एन्जॉय करताना पाहून चाहत्यांनीही तिला कमेंट करत आयुष्याच्या सुंदर सुरूवातीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. जीवनाच्या या टप्प्यावर वेळ खूप खूप महत्वाचा आहे. त्याच गोष्टीचा नताशा आनंद घेत असल्याचे पाहायला मिळतंय.


गेल्या काही महिन्यांत हार्दिक आणि नताशाने सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले आहेत. हार्दिक पांड्याने 1 जानेवारी 2020 रोजी नताशासह साखरपुडा केला होता. कोरोनाच्या संकटामुळे देश लॉकडाऊनमध्ये असताना हार्दिक आणि नताशाने देशवासियांना आपल्या पहिल्या मुलाच्या आगमनाची बातमी दिली होती.

31 मे रोजी नताशाने आपण गर्भवती असल्याची बातमी सोशल मीडियावर देत आपला आनंद चाहत्यांसह शेअर केला होता.त्यानंतर हार्दिक पाड्या नताशाच्या प्रेग्नन्सीची प्रत्येक अपडेट सातत्याने सोशल मीडियावर शेअर करायचे.

Web Title: natasa stankovic shared a Cute photo with baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.