‘नाटू नाटू’ला गोल्डन ग्लोबची झळाळी; ‘आरआरआर’च्या तेलुगू गाण्याने जिंकला पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 06:20 AM2023-01-12T06:20:17+5:302023-01-12T06:20:28+5:30
पहिला आशियाई चित्रपट
नवी दिल्ली : अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये ५५० कोटी रुपये खर्चून बनविलेल्या ‘आरआरआर’नं बुधवारी आपले नाव कोरले. या गाजलेल्या चित्रपटातील सर्वोत्कृष्ट मूळ तेलुगू भाषेतील ‘नाटू नाटू’ या गाण्याने बाजी मारली, मात्र सर्वोत्कृष्ट गैर-इंग्रजी भाषेतील चित्रपट श्रेणीत या चित्रपटाला स्थान मिळाले नाही. नाटू नाटू’ हे गाणे एम. एम. किरावानी यांनी संगीतबद्ध केले असून, ते काल भैरव आणि राहुल सिपलीगुंज यांनी गायले आहे. नृत्यदिग्दर्शन प्रेम रक्षित यांनी केले आहे. गीते चंद्रबोस यांनी ते लिहिले आहेत.
कोणाशी होती स्पर्धा
‘कॅरोलिना’ (टेलर स्विफ्ट),
व्हेन क्रॉडॅड्स सिंग्ज, ‘सियाओ पापा’
(अलेक्झांड्रे डेस्प्लॅट व इतर)
गुलेर्मो डेल टोरोचे पिनोचियो, ‘होल्ड माय हँड’ (लेडी गागा व इतर)
टॉप गन : मॅव्हरिक आणि ‘लिफ्ट
मी अप’ (टेम्स, रिहाना व इतर)
‘नाटू नाटू’ म्हणजे ‘नाचणे’. या गाण्याने इतर १४ गाण्यांसह सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीतील ९५ व्या अकादमी पुरस्कारांच्या यादीतही स्थान मिळविले आहे. २४ जानेवारीला अंतिम नामांकन जाहीर होईल.
किरावानी पुरस्कार स्वीकारत होते तेव्हा दिग्दर्शक एसएस राजामौली, अभिनेते ज्युनिअर एनटीआर, पत्नी उपासना कामिनेनी यांच्यासोबत राम चरण यांनी गर्दीतून जल्लोष
केला.