बहुप्रतिक्षित 'नवरा माझा नवसाचा २'मध्ये या लोकप्रिय मराठी कलाकाराची एन्ट्री, डबिंगही केलं पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 12:21 PM2024-07-02T12:21:01+5:302024-07-02T12:21:20+5:30

सचिन पिळगावकर यांच्या 'नवरा माझा नवसाचा २'मध्ये आणखी एका कलाकाराची एन्ट्री झालीय (sachin pilgaonkar, navra maza navsacha 2)

Navra Maaza Navsaacha 2 movie siddharth jadhav will be seen directed by sachin pilgaonkar | बहुप्रतिक्षित 'नवरा माझा नवसाचा २'मध्ये या लोकप्रिय मराठी कलाकाराची एन्ट्री, डबिंगही केलं पूर्ण

बहुप्रतिक्षित 'नवरा माझा नवसाचा २'मध्ये या लोकप्रिय मराठी कलाकाराची एन्ट्री, डबिंगही केलं पूर्ण

गेल्या काही दिवसांपासून  'नवरा माझा नवसाचा २' या सिनेमाची चर्चा शिगेला आहे. २००४ साली आलेल्या सुपरहिट  'नवरा माझा नवसाचा' सिनेमाचा पुढचा भाग बघण्यास सगळेच उत्सुक आहेत. या सिनेमाविषयी नवनवीन अपडेट येत असतात. अशातच  'नवरा माझा नवसाचा २' सिनेमाविषयी एक लेटेस्ट अपडेट समोर आलाय. तो म्हणजे एका लोकप्रिय मराठी कलाकाराची सिनेमात एन्ट्री झालीय. हा कलाकार दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे सिद्धार्थ जाधव. 

 'नवरा माझा नवसाचा २' झळकणार सिद्धार्थ जाधव

'नवरा माझा नवसाचा' सिनेमात मुंबई ते गणपतीपुळे ही कॉमेडी सफर दिसली. आता 'नवरा माझा नवसाचा २' मध्ये काय कहाणी दिसणार याची सर्वांना उत्सुकता आहे. पुन्हा एकदा सचिन पिळगावकर-सुप्रिया पिळगावकर ही एव्हरग्रीन जोडी सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. आता अभिनेता सिद्धार्थ जाधवचीही या सिनेमात वर्णी लागली आहे. सिद्धार्थने नुकतंच 'नवरा माझा नवसाचा २' सिनेमाचं डबिंग पूर्ण केलं. याशिवाय सचिन पिळगावकरांसोबत खास फोटोही काढला. 

'नवरा माझा नवसाचा २' ची उत्सुकता शिगेला

'नवरा माझा नवसाचा २' या चित्रपटात सचिन पिळगांवकर यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सुप्रिया पिळगांवकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अली असगर, निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार अशी दिग्गज कलाकारांची फौज असणार आहे. पहिल्या भागात मुंबई ते गणपतीपुळे ही एस.टी.मधली रंजक कॉमेडी सफर दिसली. आता दुसऱ्या भागात कोणतं कथानक दिसणार, याची सर्वांना उस्तुकता आहे. २०२४ च्या अखेरीस किंवा २०२५ मध्ये हा सिनेमा भेटीला येण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Navra Maaza Navsaacha 2 movie siddharth jadhav will be seen directed by sachin pilgaonkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.