कधीकाळी घर चालवण्यासाठी अभिनेता करायचा वॉचमनची नोकरी, 'गँग्स ऑफ वासेपूर'ने बदललं नशीब
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 11:26 AM2023-11-18T11:26:47+5:302023-11-18T11:34:30+5:30
आज बॉलिवूडच्या आघाडीच्या आणि बिझी कलाकारांमध्ये त्याचे नाव घेतले जाते.
केवळ आणि केवळ आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण करणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला आज कोण ओळखत नाही. शूल आणि सरफरोश या सिनेमातून नवाजने (Nawazuddin Siddiqui) करिअरची सुरुवात केली. पण या सिनेमात त्याच्या वाट्याला आलेली भूमिका इतकी लहान होती की, लोकांचं त्याच्याकडे लक्षही गेले नाही. पण याच छोट्या छोट्या भूमिकांनी नवाजला मोठे बनवले. इतके मोठे की, आज बॉलिवूडच्या आघाडीच्या आणि बिझी कलाकारांमध्ये त्याचे नाव घेतले जाते.
पार्टटाईम सिक्युरिटी गार्डची नोकरी...
नवाजुद्दीनने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे धडे गिरवलेत. पण याऊपरही अॅक्टिंग करिअरमध्ये त्याला खूप मोठा संघर्ष करावा लागला. या काळात त्याने अगदी पार्ट टाईम सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरीही केली. नवाज हा केमिस्ट्री विषयात ग्रॅज्युएट आहे. या क्षेत्रात त्याला मोठी संधी होती. पण त्याला अभिनयात रस होता. त्याने तेच केले.
नवाजुद्दीनला सुरुवातीच्या काळात मिळायचे ते छोटे-मोठे रोल. कुणीच त्याला चांगल्या भूमिका देईना. पाकिटमार किंवा वेटर इतक्यात भूमिका त्याला ऑफर होत होत्या. पण अशाच एका छोट्याशा भूमिकेने, छोट्याशा सीनने त्याचे आयुष्य बदलले. होय, अनुराग कश्यपच्या ‘ब्लॅक फ्रायडे’ या सिनेमात असगर मुकादमची एक छोटीशी भूमिका त्याच्या वाट्याला आली. या छोट्याशा भूमिकेतही नवाजने असा काही जीव ओतला की, अनुराग कश्यप एकदम त्याच्यावर फिदा झाला होता.
पण याच छोट्या छोट्या भूमिकांनी नवाजला मोठे बनवले. इतके मोठे की, आज बॉलिवूडच्या आघाडीच्या आणि बिझी कलाकारांमध्ये त्याचे नाव घेतले जाते. एका रिपोर्टनुसार, नवाजची एकूण संपत्ती 150 कोटींच्या घरात आहेत. दर महिन्याला तो सुमारे 1 कोटींची कमाई करतो. नवाजकडे महागड्या गाड्या आहेत. यात मर्सिडीज बेंज, बीएमडब्ल्यू, ऑडी सारख्या अलिशान गाड्या आहेत. नवाज एका सिनेमासाठी सुमारे 6 कोटी रूपये घेतो तर ब्रँडच्या प्रमोशनसाठी सुमारे 1 कोटींपर्यंत फी घेतो.