नवाजुद्दीन- तमन्ना मराठी सिनेमात
By Admin | Published: June 14, 2017 11:30 AM2017-06-14T11:30:44+5:302017-06-14T14:13:30+5:30
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आता मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14- आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस उतरणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आता मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. नवाजसह अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता सुनील शेट्टीसुद्धा मराठी सिनेमात झळकणार आहेत. "अ ब क" या सिनेमातून हे तीन बॉलिवूडस्टार मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करायला सज्ज झाले आहेत.
मिहीर कुलकर्णी यांची निर्मिती असलेला या सिनेमाचा मुहूर्त नुकताच पार पडला. रामकुमार शेडगे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. अभिनेता सुनील शेट्टी आणि अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत या सिनेमाचा मुहूर्त पार पडला. सिनेमाची कथा सामाजिक विषयावर आधारीत आहेत. पण सिनेमाचं कथानक नेमकं काय असेल हे गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. समाजामध्ये असलेल्या अनेक समस्या सोडविण्यासाठी तसंच सिनेमाच्या माध्यमातून समस्यांची जाणीव प्रेक्षकांना करून देण्यासाठी या सिनेमाची निर्मिती केल्याचं मत कार्यक्रमात उपस्थितांनी व्यक्त केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी या सिनेमासाठी पार्श्वगायक केलं आहे. "अ ब क" हा सिनेमा मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू अशा पाच भाषांमध्ये तयार केला जाणार आहे.
"मराठी सिनेमे चांगलं यश मिळवत असून, मला मराठी सिनेमे खूप आवडतात. मी उत्तम मराठी बोलतो म्हणूनच सिनेमात काम करण्याची इच्छा होची. असं सुनील शेट्टी म्हणाला आहे.
प्रत्येक सिनेमातील नवाजुद्दीन सिद्दीकीच्या बिनधास्त भूमिकांना प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे, त्यामुळे नवाजचा मराठी सिनेमा आणि त्यातील भूमिका कशी असणार, अशी चर्चा सिनेवर्तुळात तसंच चाहत्यांमध्ये सुरू झाली आहे. प्रेक्षक सध्या नवाजच्या बाबुमोशाय बंदूक बाज आणि मंटो या दोन सिनेमांची वाट बघत आहेत. दोन्हीही सिनेमांच्या ट्रेलरने सिनेमाबद्दलची उत्सुकतासुद्धा तितकीच वाढविली आहे.
बाहुबली या सिनेमाने नवीन फॅन क्लब तयार करणाऱी अभिनेत्री तमन्ना भाटीयासुद्धा या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. तमन्नाच्या बाहुबली आणि बाहुबली या दोन्हीही सिनेमातील अभिनयाचं आणि तीने केलेल्या अॅक्शन सीन्सचं कौतुक झालं होतं.