'जवान'साठी नयनतारा नव्हे 'ही' अभिनेत्री होती पहिली पसंत, फॅमिली प्लॅनिंगमुळे सोडला चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 02:53 PM2024-11-20T14:53:22+5:302024-11-20T15:37:42+5:30

'जवान'साठी नयनतारा नव्हे 'ही' अभिनेत्री पहिली पसंत होती. पण, तिने फॅमिली प्लॅनिंगसाठी चित्रपटाला नकार दिला होता.

2023 हे वर्ष शाहरुख खानच्या चित्रपट कारकिर्दीतील सर्वोत्तम वर्षांपैकी एक होते. खरं तर, गेल्या वर्षी किंग खानच्या 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' या तीन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती. यापैकी सप्टेंबर 2023 मध्ये रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झालेल्या 'जवान'ने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडले.

साऊथ सिनेमाची लेडी सुपरस्टार नयनताराने शाहरुख खानसोबत जवान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण, या चित्रपटासाठी नयनतारा ही पहिली पसंती नव्हती हे तुम्हाला माहीत आहे का?

पण, या चित्रपटासाठी नयनतारा ही पहिली पसंती नव्हती हे तुम्हाला माहीत आहे का?

बॉक्स ऑफिसवर 1100 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या 'जवान'मध्ये शाहरुख खानसोबत आणखी एक साऊथ स्टार मुख्य भूमिकेत असती, पण तिने वैयक्तिक कारणांमुळे 'जवान' चित्रपट नाकारला.आणि नंतर नयनताराला चित्रपटाची संधी मिळाली.

नयनतारापूर्वी 'जवान' मध्ये मुख्य भूमिका समंथा रुथ प्रभूला ऑफर केली गेली होती. परंतु त्यावेळी अभिनेत्रीला तिच्या वैयक्तिक जीवनावर लक्ष केंद्रित करायचे होते. तिचे माजी पती नागा चैतन्यसोबत फॅमिली प्लॅनिंग सुरू होते. पण, समंथाच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत.

तिने केवळ मोठा सिनेमाचं गमावला नाही. तर तिचा नागा चैतन्य याच्यापासून घटस्फोटही झाला. तिने वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात खडतर काळाचा सामाना केला.

समांथा हिने नकार दिल्यानंतर नयनताराला 'जवान'साठी मुख्य अभिनेत्री म्हणून कास्ट करण्यात आले होते. या चित्रपटात तिने शाहरुख खानचे पात्र आझादची पत्नी नर्मदा राय हिची भूमिका उत्कृष्टपणे साकारली होती.

शाहरुख खान आणि नयनतारा यांच्याशिवाय 'जवान'मध्ये विजय सेतुपती, दीपिका पादुकोण, प्रियामणी आणि सान्या मल्होत्रा ​​यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.