भारती सिंग-हर्ष लिंबाचिया अडचणीत, ड्रग्ज प्रकरणी NCBनं दाखल केलं 200 पानी आरोपपत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 11:00 AM2022-10-29T11:00:35+5:302022-10-29T11:07:06+5:30
कॉमेडी क्वीन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढताना दिसत आहेत. ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने पुन्हा एकदा भारती आणि हर्ष यांच्यावर मुसक्या आवळल्या आहेत. एनसीजीने या दाम्पत्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.
कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्याविरुद्ध एनसीबीने आरोपपत्र दाखल केले आहे. हे आरोपपत्र ड्रग्ज प्रकरणी करण्यात आले आहे. या दोघांविरुद्ध न्यायालयात 200 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 2020 मध्ये दोघांना एनसीबीने अटक केली होती. दोघेही जामिनावर बाहेर असले तरी. जून 2020 मध्ये सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ड्रग्जच्या सेवनाची अनेक प्रकरणं समोर आली होती. एनसीबीने तपास सुरू केला तेव्हा अनेक बडे सेलिब्रिटी यात अडकले होते.
एनसीबीने ड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खानसह अनेक बड्या सेलिब्रिटींची चौकशी केली होती. याच क्रमाने, NCB ने नोव्हेंबर 2020 मध्ये भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या कार्यालयावर आणि घरावर छापे टाकले. यावेळी त्याच्या घरातून गांजा जप्त करण्यात आला. यानंतर एनसीबीने भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाला अटक केली होती.
एनसीबीने हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंगला न्यायालयात हजर केले आणि त्यानंतर दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान त्याननंतर १५ हजार रुपये भरुन जामीन मंजूर झाला. तेव्हापासून दोघेही बाहेर आहेत. मात्र, फिर्यादीचे म्हणणे न ऐकता जामीन मंजूर करण्यात आल्याचा दावा एनसीबीने न्यायालयात केला होता.