Alia Bhatt Pregnant: आलियाच्या प्रेग्नंसीवर नीतू कपूर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 05:18 PM2022-06-27T17:18:07+5:302022-06-27T17:18:51+5:30

Neetu kapoor: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या आलियाने तिच्या सोनोग्राफी करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. सोबतच कॅप्शनमध्ये आमच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होतंय असंही सांगितलं आहे.

neetu kapoor shocking reaction on alia bhatt pregnancy | Alia Bhatt Pregnant: आलियाच्या प्रेग्नंसीवर नीतू कपूर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या...

Alia Bhatt Pregnant: आलियाच्या प्रेग्नंसीवर नीतू कपूर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या...

googlenewsNext

अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kpaoor) या जोडीने दोन महिन्यांपूर्वीच मोठ्या थाटात लग्नगाठ बांधली होती. विशेष म्हणजे या लग्नाच्या चर्चा थांबत नाहीत. त्यामध्येच या जोडीने आणखी एक गुडन्यूज शेअर करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला. लग्नानंतर २ महिन्यांनी आलियाने ती आई होणार असल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. आलियाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याविषयी सांगितलं. विशेष म्हणजे आलियाची ही गोड बातमी ऐकताच नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. यामध्येच आता रणबीरच्या आईने म्हणजेच अभिनेत्री नीतू कपूरने याविषयी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या आलियाने तिच्या सोनोग्राफी करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. सोबतच कॅप्शनमध्ये आमच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होतंय असंही सांगितलं आहे. तिची ही पोस्ट पाहिल्यावर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण आश्चर्यचकित झालं असून सध्या नेटकरी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. यामध्येच आता नीतू कपूर यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

नीतू कपूर सध्या एका रिअॅलिटी शोच्या परिक्षकपदाची भूमिका पार पाडत आहेत. या शोच्या सेटवरच त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली. नीतू कपूरला पाहिल्यावर पापाराजींनी तिला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. यावर कशाबद्दल शुभेच्छा असा प्रश्न त्यांनी विचारला. यावर उपस्थितींनी आलिया-रणबीरची गुडन्यूज समजल्याचं सांगितलं. त्यावर 'जुग जुग जियो', असं या पापाराजींनी म्हटलं. त्यावर "नाही नाही. सध्या 'शमशेरा' मग 'ब्रह्मास्त्र'. पण, पहिला 'शमशेरा' हा", असं म्हटलं. तसंच आलियाने दिलेल्या गोड बातमीवर लोकांच्या प्रतिक्रिया पाहून त्यांनी उपस्थितांना 'थॅक्यू' म्हणत त्यांचे आभारही मानले.

दरम्यान, आलियाने आई होणार असल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केल्यानंतर सोनी राजदान यांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये फोटो शेअर करत आपल्या लेकीचं आणि जावयाचं अभिनंदन केलं आहे.
 

Web Title: neetu kapoor shocking reaction on alia bhatt pregnancy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.