प्रेग्नंसीनंतर ‘या’ अभिनेत्रीला मिळेना काम, पुन्हा एकदा समोर आले चंदेरी दुनियेचे वास्तव !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 10:10 AM2019-11-23T10:10:56+5:302019-11-23T10:11:15+5:30
लग्नाअगोदरच नेहा प्रेग्नंट होती.त्यामुळे अंगद बेदीसोबत गुपचूप लग्नगाठ बांधली. नेहाने लग्नाच्या काही महिन्यानंतरच मुलीला जन्म दिला.
चंदेरी दुनियेत सुंदर दिसण्याला खूप महत्त्व आहे. जितके तुम्ही सुंदर ग्लॅमरस दिसता त्यावर बॉलिवूडमध्ये यश ठरवले जाते. फार फार तर लग्न होत नाही तोपर्यंत तुम्हाला कामही मिळतील. एकदा काय अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकल्या तर कामं मिळण्याची संधी तितक्याच कमी होतात. लग्नानंतर अशीच एक अभिनेत्री जिला आता इच्छा असूनही काम मिळत नाही. ती अभिनेत्री आहे नेहा धुपिया. गेल्याचवर्षी १० मे रोजी नेहा अंगद बेदीसह लग्नाच्या बेडीत अडकली होती. लग्नाअगोदरच नेहा प्रेग्नंट होती.त्यामुळे अंगद बेदीसोबत गुपचूप लग्नगाठ बांधली. नेहाने लग्नाच्या काही महिन्यानंतरच मुलीला जन्म दिला. लग्नानंतर आपसुकच नेहा संसारात रमली असली तरी आता तिला काम करण्याची इच्छा असली तरी तिला संधीच मिळत नाही. लग्न झाल्यापासून नेहाकडे एकही सिनेमाची ऑफर नाही. करिअर सुरु ठेवण्यासाठी आणि पैसा कमावण्याकरिता तिने आपला मोर्चा रुपेरी पडद्यावरुन छोट्या पडद्याकडे वळवला आहे. सध्या ती एमटीवी रोडीज या रिअॅलिटी शोच्या १७व्या पर्वात काम करत आहे.
नेहा धुपिया बरेच दिवसांपासून मोठ्या पडद्यावर दिसली नाही. आता नेहाची मुलगी मोठी होत असल्यामुळे नेहाने काम मिळवण्यास सुरूवात केली. मात्र अनेकांनी तिला नकार दिल्याचा खुलासा खुद्द नेहानेच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. सिनेमा तर सोडाच सध्या वेगवेगळी माध्यम असली तरीही खूप प्रयत्न करावे लागत आहे. प्रेग्नंट होते तेव्हा 'तुम्हारी सुलू' या सिनेमाची ऑफर मला आली होती. या सिनेमात मी शेवटचं काम केलं. त्यानंतर मला कोणत्याही सिनेमाची ऑफर आलेली नाही असं, बाळाचा जन्म झाल्यानंतर वजन वाढलं होतं. वाढलेल्या वजनामुळे अनेकदा सोशल मीडियावर मला ट्रोलही करण्यात आलं.सोशल मीडियावर ब-याचदा माझ्या वाढलेल्या वजनामुळे खिल्लीही उडवली गेली. यामुळे अनेकदा मानसिक दडपणही यायचं असंही नेहाने सांगितले.
लग्नाआधी माझ्याकडे खूप ऑफर्स होत्या. काम मिळवण्यासाठी कधी इतकी मेहनत घ्यावी लागली नाही. मात्र लग्नानंतर चित्र संपूर्ण पालटले. हळु हळु लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोणही बदलत गेला आणि आता कामही मिळेनासे झाले आहे असेही नेहाने सांगितले.