Neha Dhupia : नेहा धूपिया तिसऱ्यांदा होणार आई? VIDEO व्हायरल होताच सुरू झाली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 01:39 PM2023-04-16T13:39:16+5:302023-04-16T13:40:58+5:30

Neha Dhupia : बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया या ना त्या कारणानं सतत चर्चेत असते. चित्रपटांपेक्षा तिच्या पर्सनल लाईफचीच अधिक चर्चा होते. आता पुन्हा एकदा नेहा चर्चेत आली आहे.

Neha Dhupia Pregnant For Third Time Fans Spot Baby Bump Again | Neha Dhupia : नेहा धूपिया तिसऱ्यांदा होणार आई? VIDEO व्हायरल होताच सुरू झाली चर्चा

Neha Dhupia : नेहा धूपिया तिसऱ्यांदा होणार आई? VIDEO व्हायरल होताच सुरू झाली चर्चा

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया (Neha Dhupia) या ना त्या कारणानं सतत चर्चेत असते. चित्रपटांपेक्षा तिच्या पर्सनल लाईफचीच अधिक चर्चा होते. आता पुन्हा एकदा नेहा चर्चेत आली आहे. नुकतीच नेहा पती अंगदी बेदीसोबत एका इव्हेंटमध्ये दिसली आणि या इव्हेंटमधील तिचा व्हिडीओ पाहून नेहा तिसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना उधाण आले.
 इव्हेंटमध्ये नेहा डीप नेक ग्रीन गाऊनमध्ये दिसली तर तिचा पती अंगद बेदी काळ्या रंगाचा कुर्ता आणि धोती अशा लुकमध्ये दिसला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि नेहा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. व्हिडीओ पाहून ही प्रेग्नंट आहे का, असा प्रश्न चाहते विचारू लागले. 

नेहा धूपिया आणि अंगद बेदीनं 10 मे 2018 ला लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर काहीच महिन्यांनी नेहानं प्रेग्नंट असल्याचे जाहीर केलं होतं. यानंतर नेहा लग्नाआधीच प्रेग्नंट असल्याची चर्चा रंगली होती. नोव्हेंबर 2018 रोजी नेहाने कन्यारत्नाला जन्म दिला होता. २०२१ मध्ये नेहा दुसऱ्यांदा आई झाली. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला.

लग्नाच्या चार वर्षांआधी अंगदने नेहाला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. पण तेव्हा नेहा कुण्या दुसऱ्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण हे रिलेशनशिप तुटल्यानंतर नेहा व अंगद यांची जवळीक वाढली आणि दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला होता. नेहाने 2003 मध्ये ‘कयामत’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. 

ज्येष्ठ क्रिकेटपटू बिशन सिंह बेदी यांचा मुलगा म्हणजेच अंगद बेदी याने क्रिकेट विश्वात स्वत:ची अशी एक वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. दिल्लीच्या रणजी संघाकडून सुरुवातीला काही वर्ष क्रिकेट खेळणाऱ्या अंगदने त्यानंतर मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. रेमो डिसूझा दिग्दर्शित ‘फालतू’ या चित्रपटातून त्याचा बाॅलिवूड डेब्यू झाला. उंगली, पिंक, टायगर जिंदा है या चित्रपटांतही तो झळकला. 
नेहा शेवटची 'अ थर्सडे' या चित्रपटात दिसली होती. तिचा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता.

Web Title: Neha Dhupia Pregnant For Third Time Fans Spot Baby Bump Again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.