'इंडियन आयडॉल'च्या ऑडिशनसाठी नेहा कक्कड होती लाइनमध्ये उभी, परफॉर्मन्सने जज होते नाखूष
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 06:46 PM2021-01-28T18:46:02+5:302021-01-28T18:47:09+5:30
नेहा कक्कडचा हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. या व्हिडीओवर चाहते खूप रिएक्शन देत आहेत.
गायिका नेहा कक्कडने आपल्या सुरेल स्वरांनी अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. चित्रपटातील गाण्यांपासून स्टेज शोपर्यंत प्रत्येक ठिकाणी नेहा कक्कडला खूप डिमांड आहे. मात्र तिच्यासाठी प्रवास सोप्पा नव्हता. नेहा कक्कड इतर लोकांप्रमाणे लाइन लावून इंडियन आयडॉलचे ऑडिशन
दिले होते. त्यावेळी अनु मलिक, सोनू निगम आणि फराह खान परीक्षक होते. नेहा कक्कडचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
नेहा कक्कडच्या जुन्या व्हिडीओत पहायला मिळत आहे की, ती ऑडिशनसाठी लाइन लावून आपला नंबर येण्याची वाट पाहत आहे आणि तिचा नंबर आल्यावर परिक्षकांसमोर परफॉर्म करते आहे. या व्हिडीओत अशी एक वेळ आली होती जेव्हा तिचा परफॉर्मन्स पाहून परीक्षक नाराज झाले होते. या व्हिडीओचा सेट इंडियाने युट्यूब चॅनेलवर पोस्ट केली आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ २५ लाखांहून जास्त लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओवर चाहते खूप रिएक्शन देत आहेत.
नेहा कक्कडच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर नुकतेच तिचे गले लगाना है गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यात निया शर्मा आणि अभिनेता शिवीन दिसतो आहे. नेहा कक्कडच्या या गाण्याला सोशल मीडियावर खूप पसंती मिळते आहे. यापूर्वी नेहा कक्कड आणि रोहनप्रीत सिंगचे एक गाणे ख्याल रख्या कर रिलीज झाले होते. या गाण्यालादेखील चाहत्यांची खूप पसंती मिळाली होती.