हॉटेल रुममधून नेहा कक्करच्या मौल्यवान वस्तूंची चोरी; आयफोन अन् हिऱ्याच्या अंगठीसह अनेक महागड्या गोष्टी लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 13:52 IST2022-05-15T13:52:24+5:302022-05-15T13:52:51+5:30
Neha kakkar: बऱ्याचदा म्युझिक अल्बममुळे चर्चेत राहणारी ही जोडी सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. हिमाचलमध्ये फिरायला गेलेल्या या जोडीचा हॉटेलमधून मौल्यवान ऐवज चोरीला गेला आहे.

हॉटेल रुममधून नेहा कक्करच्या मौल्यवान वस्तूंची चोरी; आयफोन अन् हिऱ्याच्या अंगठीसह अनेक महागड्या गोष्टी लंपास
आपल्या सुरेल आवाजाने कानसेनांना तृप्त करणारी लोकप्रिय गायिका म्हणजे नेहा कक्कर (neha kakkar). प्रत्येक गाण्यामुळे चर्चेत येणारी नेहा गेल्या काही काळापासून तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत येत आहे. नेहाने पंजाबी गायक रोहनप्रीत सिंहसोबत (rohanpreet singh) लग्न केलं असून ही जोडी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. बऱ्याचदा म्युझिक अल्बममुळे चर्चेत राहणारी ही जोडी सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. हिमाचलमध्ये फिरायला गेलेल्या या जोडीचा हॉटेलमधून मौल्यवान ऐवज चोरीला गेला आहे.
काही दिवसांपूर्वीच नेहा आणि रोहनप्रीत हिमाचलमध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेले होते. यावेळी ते मंडीतील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. मात्र, या हॉटेलमध्ये त्यांच्या सामानाची चोरी झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या हॉटेल रुममधून रोहनप्रीतचं अॅप्पल वॉच, आयफोन आणि हिऱ्याची अंगठी लंपास करण्यात आली आहे.
सकाळी उठल्यानंतर रोहनप्रीतने त्याच्या रुममध्ये पाहिलं तर त्याच्या मौल्यवान वस्तू रुममधून गायब झाल्या होत्या. टेबलवर त्याने काढून ठेवलेली एकही वस्तू तेथे नव्हती. त्यामुळे त्यांनी याविषयी तात्काळ पोलिस तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांनी संपूर्ण स्टाफची कसून चौकशी केली असून सध्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोराचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे.