नेहा कक्करने संगीत सेरमनीमध्ये केला धमाकेदार भांगडा, व्हिडीओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 03:09 PM2020-10-31T15:09:04+5:302020-10-31T15:22:27+5:30

नेहाचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नेहाच्या संगीत सेरमनीचा आहे. ज्यात ती धमाकेदार भांगडा करताना दिसत आहे.

Neha Kakkar in laal ghagra dance on illegal weapon song sangeet ceremony video viral | नेहा कक्करने संगीत सेरमनीमध्ये केला धमाकेदार भांगडा, व्हिडीओ झाला व्हायरल

नेहा कक्करने संगीत सेरमनीमध्ये केला धमाकेदार भांगडा, व्हिडीओ झाला व्हायरल

googlenewsNext

बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्कर आणि रायजिंग स्टार फेम रोहनप्रीत सिंह हे दोघे नुकतेच विवाह बंधनात अडकले. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दोघांची जोडी त्यांच्या फॅन्सना खूप आवडली आहे. नेहाचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नेहाच्या संगीत सेरमनीचा आहे. ज्यात ती धमाकेदार भांगडा करताना दिसत आहे.

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंहचा हा व्हिडीओ त्यांच्या फॅन क्लबने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडीओत नेहा सुपरहिट पंजाबी गाणं 'इल्लीगल वेपन'वर धमाकेदार भांगडा करताना दिसत आहे. व्हिडीओत तिने व्हाइट कलरचा क्रॉप टॉप घातला आहे. ज्यात ती सुंदर दिसत आहे. (कुंकू लावतानापासून ते मंगळसूत्र घालण्यापर्यंत, बघा नेहाच्या लग्नाचे न पाहिलेले खास फोटो)

संगीत सेरमनीसोबतच नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांच्या लग्नातील वेगवेगळ्या रितीरिवाजांचे फोटोही व्हायरल झाले आहेत. हळदीपासून ते रिसेप्शनपर्यंत व्हिडीओत नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंहचा अंदाज बघण्यासारखाच आहे. (नेहूप्रीत दा ब्याह...! नेहा कक्करने शेअर केलेत गुरूद्वारा वेडिंगचे Unseen फोटो)

दरम्यान, नेहा कक्करने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत फॅन्सना रिलेशनशिपबाबत माहिती दिली होती. याआधी तिच्या लग्नाची दोनदा चर्चा रंगली होती. तसेच नुकतंच नेहा आणि रोहनप्रीत सिंहचं नेहू दा व्याह हे गाणंही रिलीज झालं आहे. जे फॅन्सना चांगलंच पसंत पडलंय.
 

Web Title: Neha Kakkar in laal ghagra dance on illegal weapon song sangeet ceremony video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.