जे बात! अनेकांना मागे टाकत नेहा कक्करने केला 'धमाका', काय ते वाचून तुम्हीही कराल तिचं कौतुक...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 11:42 AM2020-12-15T11:42:09+5:302020-12-15T11:43:29+5:30

नेहाने सांगितले की, तिला या लिस्टमध्ये आपलं नाव बघून किती अभिमान वाटत आहे. तिने पोस्टच्या माध्यमातून फॅन्सला धन्यवाद दिले.

Neha Kakkar name in the forbes list of most influential celebrities on social media | जे बात! अनेकांना मागे टाकत नेहा कक्करने केला 'धमाका', काय ते वाचून तुम्हीही कराल तिचं कौतुक...

जे बात! अनेकांना मागे टाकत नेहा कक्करने केला 'धमाका', काय ते वाचून तुम्हीही कराल तिचं कौतुक...

googlenewsNext

आपल्या लग्नामुळे काही गेले काही दिवस सोशल मीडियावर धमाका करणारी नेहा कक्कर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नेहाचा आनंद सध्या सातव्या आसमानावर असेल. कारण फोर्ब्सच्या यादीत नेहाचं नाव टॉपवर आहे. नेहाने ही आनंदाची बातमी इन्स्टाग्रामवरून फॅन्ससोबत शेअर केली आहे. 

नेहा कक्करने आपल्या मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवलं आहे. अशात तिचे जगभरात फॅन्स आहेत आणि तिच्या स्ट्रगलचे चाहतेही अनेक आहेत. दरम्यान फोर्ब्स मॅगझीनने आशियातील काही सेलिब्रिटींची यादी जाहीर केली. यात सोशल मीडियावर अॅक्टिव आणि इतरांना प्रेरित करणारे स्टार्स आहेत. एशिया पॅसिफिक रीजनबाबत सांगायचं तर नेहा कक्कर फोर्ब्सच्या या यादीत सर्वात वर आहे.

नेहाने सांगितले की, तिला या लिस्टमध्ये आपलं नाव बघून किती अभिमान वाटत आहे. तिने पोस्टच्या माध्यमातून फॅन्सला धन्यवाद दिले. नेहाने पोस्टमध्ये लिहिले की, 'स्वत:वर फार गर्व होत आहे. तुम्हाला माहीत असेल या लिस्टमध्ये अमिताभ बच्चन सर, शाहरूख सर आणि माझं नाव आहे. देवाचे आभार. तुम्हा सर्वांचे आभार'. महत्वाची बाब म्हणजे या लिस्टमध्ये भारतातील केवळ १२ स्टार्सची नावे आहेत. त्यात नेहाने बाजी मारली आहे.

दरम्यान नेहा कक्करचा पती रोहनप्रीत सिंहने सुद्धा तिला यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. रोहनप्रीत सिंहने नेहा कक्कर पोस्टवर कमेंट केली आणि लिहिले की, 'अरे वाह, ही तर फार शानदार गोष्ट आहे. मला फार आनंद झाला आणि मला तुझा अभिमान आहे. तू बेस्ट आहेस आणि तुझ्यासाठी काहीच अशक्य नाही. प्राउड हसबंड...'.
 

Web Title: Neha Kakkar name in the forbes list of most influential celebrities on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.