लोकांचा उपद्व्याप अन् लोकांच्याच शिव्या! जे केलेच नाही, त्यासाठी ट्रोल झाली नेहा शर्मा!!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 09:08 AM2018-06-26T09:08:20+5:302018-06-26T09:08:44+5:30
‘तुम बिन2’ फेम नेहा शर्मा हिने सोशल मीडियावर शेअर केलेला एक सेल्फी चर्चेचा विषय ठरला आहे. या सेल्फीवरून नेहाला बरेच भले-बुरे ऐकवले गेले. तिची बरीच खिल्ली उडवली गेली.
मुंबई : ‘तुम बिन2’ फेम नेहा शर्मा हिने सोशल मीडियावर शेअर केलेला एक सेल्फी चर्चेचा विषय ठरला आहे. या सेल्फीवरून नेहाला बरेच भले-बुरे ऐकवले गेले. तिची बरीच खिल्ली उडवली गेली. खरे तर नेहाचा काहीही दोष नसताना, याप्रकरणात तिला ट्रोल व्हावे लागले. शेवटी नेहाचाही संयम सुटला आणि तिने लोकांना चांगलेच सुनावले. आता हे सगळे प्रकरण काय ते आपण जाणून घेऊ यात.
त्याचे झाले असे ती, गत २२ जूनला नेहाने एक मार्निंग सेल्फी अपलोड केला होता. पण कुणीतरी तिच्या या फोटोसोबत छेडछाड करत, या सेल्फीत ‘सेक्स टॉयज’ टाकला. यानंतर छेडछाड केलेला नेहाचा सेल्फी व्हायरल केला गेला. साहजिकचं या फोटोतील ‘सेक्स टॉयज’ बघून काही लोक भडकलेच. त्यांनी कुठलीही शहानिशा न करता, नेहाला नाही नाही ते बोलणे सुरू केले. कुणी तिला ‘बेशर्म’ म्हटले तर कुणी तिची लाज काढली. मग मात्र नेहा भडकली.
माझ्या फोटोसोबत छेडछाड केली गेली आहे. त्यात ‘सेक्स टॉय’ दाखवून ती दुस-याच कुणी व्हायरल केली आहे, हे सर्वात आधी नेहाने स्पष्ट केले. सोबत तिचा खरा सेल्फीही पोस्ट केला. यानंतर तिने छेडछाड करणा-या आणि ट्रोल करणा-या दोघांनाही चांगलेच धारेवर धरले. ‘लोक किती खालच्या स्तराला जावू शकतात. फोटोसोबत छेडछाड करणे थांबवा आणि माझा खरा फोटो बघा,’ असे तिने लिहिले. एकंदर काय लोकांनी केले आणि लोकांनीच नेहाला ऐकवले, असे काहीसे नेहाबद्दल झाले.
बिहारमधील भागलपूर शहरात जन्मलेली नेहा बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान पक्के करण्यासाठी अद्यापही धडपडते आहे. २९ वर्षीय नेहाने दिल्लीच्या एनआयआयएफटी कॉलेजमधून फॅशन डिझायनिंगची पदवी घेतली. नेहाने तेलगू चित्रपटातून तिच्या अभिनय करिअरला सुरुवात केली. बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये झळकलेली नेहा अजूनही दमदार भूमिकेच्या शोधात आहे. नेहा ‘तुम बिन २’मध्ये बघावयास मिळाली होती. यानंतर क्या सुपर कुल है हम , यंगिस्तान , यमला पगला दिवाना आदि चित्रपटांमध्ये तिने आपल्या दमदार अभिनयाची झलक दाखविली. एफएचएम या साप्ताहिकाने नेहाचे जगातील सर्वाधिक सेक्सी महिलांच्या यादीत सातवे स्थान दिले होते. त्यावेळी तिच्या सौंदयार्ची सर्वदूर चर्चा रंगली होती. नेहा बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. ती एका राजकीय कुटुंबाशी संबंधित आहे.