बाबो..! ना जिम ना योग जेठालालने घटवले तब्बल १० किलो वजन, हे आहे त्यामागचे सीक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 08:04 PM2021-09-17T20:04:38+5:302021-09-17T20:05:47+5:30

दिलीप जोशी यांनी कोणत्याही एक्सरसाइजशिवाय १० किलो वजन घटवले आहे.

Neither Jim nor Yoga Jethalal lost 10 kg weight, this is the secret behind it | बाबो..! ना जिम ना योग जेठालालने घटवले तब्बल १० किलो वजन, हे आहे त्यामागचे सीक्रेट

बाबो..! ना जिम ना योग जेठालालने घटवले तब्बल १० किलो वजन, हे आहे त्यामागचे सीक्रेट

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे. या मालिकेतील जेठालाल, दयाबेन, तारक मेहता, बबिता, भिडे अशा सर्वच पात्रांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे. या मालिकेत जेठालालची भूमिका दिलीप जोशीने साकारली आहे. दरम्यान नुकतेच दिलीज जोशी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. जिम किंवा योग न करता दिलीप जोशी यांनी १० किलो वजन घटविले असल्याचे समजते आहे. 

झी न्यूजच्या वृत्तानुसार, दिलीप जोशी यांनी कोणत्याही एक्सरसाइजशिवाय १० किलो वजन घटवले आहे. याबद्दल दिलीप जोशी यांनी सांगितले की, 'मधल्या काळात माझे वजन खूप वाढले होते. त्यामुळे मला अनेक शारीरिक त्रासाचा सामना करावा लागत होता. त्यामुळे मी वजन कमी करायचे ठरविले. तसेच एक अभिनेता असल्यामुळे, आमच्या शूटिंगच्या वेळा निश्चित नसतात. त्यामुळे इतक्या बिझी शेड्युलमधून मला जिम आणि इतर गोष्टींसाठी वेळ मिळणे खूप कठीण होते'.


त्यांनी पुढे सांगितले की, 'त्यामुळे मी दुसरा मार्ग निवडला. मी माझ्या खाण्यामध्ये बदल केला. मी कडक डाएट फॉलो केला आहे. त्यामुळे माझे वजन कमी होण्यास मदत झाली. 

Web Title: Neither Jim nor Yoga Jethalal lost 10 kg weight, this is the secret behind it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.