ना मणिरत्नम अन् नाही अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय पडली या सुपरस्टारच्या पाया, व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 12:05 PM2024-09-30T12:05:07+5:302024-09-30T12:06:23+5:30
Aishwarya Rai Bachchan : आयफा (IIFA) सोहळ्यातील ऐश्वर्या राय बच्चनचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.
यंदाच्या आयफा (IIFA) सोहळ्यात चियान विक्रम, नानी आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नावाची चर्चा झाली. 'दसरा' या तेलगू चित्रपटासाठी नानीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर तमिळ चित्रपट 'पोनियान सेल्वन २'च्या चियान विक्रमला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर ऐश्वर्या राय बच्चन(Aishwarya Rai Bachchan)ला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. अबुधाबीच्या यास बेटावर झालेल्या या सोहळ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये साऊथचा सुपरस्टार नंदामुरी बालकृष्ण ऐश्वर्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देताना दिसत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, नंदामुरी बालकृष्ण (NBK) स्टेजवर आले आणि ऐश्वर्या राय बच्चनला पुरस्कार देण्यास सुरुवात करताच ऐश्वर्याने ट्रॉफी घेण्यापूर्वी त्यांच्या पायांना स्पर्श केला. नंदामुरी बालकृष्ण यांनी तिला प्रथम आशीर्वाद दिला. त्यानंतर तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीची ट्रॉफी देण्यात आली. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. स्टेजवर ती दुसऱ्यांदा कोणाच्या पाया पडताना दिसली.
Bollywood Queen Aishwarya Rai respect towards #NBK ❤️😍👌
— manabalayya.com (@manabalayya) September 28, 2024
Aishwarya Rai receives the Best Actress (Tamil) Award from #NandamuriBalakrishna garu at #IIFAUtsavam2024 👏👌#IIFA#IIFAawards2024#AishwaryaRai#JaiBalayyapic.twitter.com/XBjgL48FYu
ऐश्वर्या राय बच्चनने यापूर्वी मणिरत्नम यांच्या पाया पडली होती. ऐश्वर्या आयफा उत्सवम २०२४ मध्ये सर्वोत्कृष्ट डायरेक्ट कॅटेगरीत सादरकर्ता बनली. त्यांनी मणिरत्नम यांना 'पोनियिन सेल्वन २' मधील कामासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार दिला. घोषणा करताना ऐश्वर्या खूप उत्साही दिसत होती आणि जेव्हा तो स्टेजवर आला तेव्हा तिने त्याच्या पायाला स्पर्श केला.
ऐश्वर्याने व्यक्त केली कृतज्ञता
आयफाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ऐश्वर्या राय बच्चन म्हणाली, ते माझे गुरु आहेत. मणिरत्नम यांच्यासोबत काम केल्याबद्दल मी सुरुवातीपासून कृतज्ञ आहे. पोन्नियिन सेल्वनमध्ये नंदिनीची भूमिका साकारणे आणि हे यश माझ्या टीमसोबत शेअर करणे हा सन्मान आहे. आयफा फेस्ट २०२४ शुक्रवारी रात्री पार पडला. ती पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाली आणि दुसऱ्याच दिवशी ती भारतात परतली.