नेटफ्लिक्सने 'Kalki 2898 AD'च्या सेटवरील BTS VIDEO केला शेअर, कसं झालं शूटिंग?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 06:04 PM2024-08-27T18:04:45+5:302024-08-27T18:07:08+5:30

पॅन इंडिया प्रेक्षक समोर ठेवून तयार केलेल्या या चित्रपटात जबरदस्त व्हीएफएक्स, सीजीआय  इफेक्ट्स पाहायला मिळाले.

Netflix shared Prabhas Deepika Padukone Kalki 2898 Ad Movie Behind The Scene | नेटफ्लिक्सने 'Kalki 2898 AD'च्या सेटवरील BTS VIDEO केला शेअर, कसं झालं शूटिंग?

नेटफ्लिक्सने 'Kalki 2898 AD'च्या सेटवरील BTS VIDEO केला शेअर, कसं झालं शूटिंग?

Kalki 2898 AD : सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांच्या 'कल्की 2898 एडी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला. सिनेमातील प्रभासचा स्वॅग चाहत्यांच्या पसंतीस उतरतल्याचं पाहायला मिळालं. आता नुकतंच नेटफ्लिक्सने  'Kalki 2898 AD'च्या सेटवरील BTS VIDEO व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सिनेमाचं शुटिंग कसं झालं, याची एक झलक पाहायला मिळतेय. 


पॅन इंडिया प्रेक्षक समोर ठेवून तयार केलेल्या या चित्रपटात जबरदस्त व्हीएफएक्स, सीजीआय  इफेक्ट्स पाहायला मिळाले. सिनेमातील हे सीन शुट करताना जी मेहनत घ्यावी लागली, ती मेहनत आता नेटफ्लिक्सने शेअर केलेल्या BTS व्हिडीओमध्ये पाहायला मिळतेय. BTS  म्हणजे Behind The Scene व्हिडीओ, यामध्ये  प्रभास,अमिताभ आणि कमल हासन यांच्यासह इतर कलाकारही मेहनत घेताना दिसून आले आहेत.  हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नेटकरी कमेंट करत या चित्रपटाविषयीचे आपले प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत.


 'Kalki 2898 AD' हा सिनेमा सर्व भाषांमध्ये २७ जून रोजी प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता या सिनेमाचं हिंदी व्हर्जन ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवरदेखील आलं आहे. Kalki 2898 AD  सिनेमात आधुनिक कथेला पौराणितेची जोड दिल्याने हा सिनेमा लोकांना आवडतोय. सिनेमात महाभारताचा सुरेख संबंध जोडण्यात आलाय. 'अश्वत्थामा' आणि 'श्रीकृष्ण' यांच्यातला भन्नाट संवाद सिनेमात पाहायला मिळतो. 

Web Title: Netflix shared Prabhas Deepika Padukone Kalki 2898 Ad Movie Behind The Scene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.