रणबीरच्या आयुष्यात नवा रोमान्स

By Admin | Published: February 15, 2016 10:39 AM2016-02-15T10:39:32+5:302016-02-15T10:45:22+5:30

रणबीर कपूरला आयुष्यात नव प्रेम मिळालयं. कतरिना कैफशी ब्रेक अप झाल्यानंतर आता रणबीरच्या आयुष्यात आलेली नवीन तरुणी कोण ?

New Romance in Ranbir's Life | रणबीरच्या आयुष्यात नवा रोमान्स

रणबीरच्या आयुष्यात नवा रोमान्स

googlenewsNext

tyle="text-align: justify;"> ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. १५ - रणबीर कपूरला आयुष्यात नव प्रेम मिळालयं. कतरिना कैफशी ब्रेक अप झाल्यानंतर आता रणबीरच्या आयुष्यात आलेली नवीन तरुणी कोण ? किंवा तिच्यामुळेच तर कतरिनाबरोबर त्याचा ब्रेकअप झाला नाही ना ? असे प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाले असतील. तर, थोड थांबा हे नव प्रेम चारचाकी आहे. 
चार चाकी म्हणजे, रणबीर आपल्या आयुष्यात तरुणींइतकच गाडयांवरही प्रेम करतो. बॉलिवुडलाईफ डॉट कॉमच्या वृत्तानुसार रणबीरने कतरिना बरोबर ब्रेकअप झाल्यानंतर नवी निळया रंगाची रेंज रोव्हर गाडी विकत घेतली आहे. 
रणबीरकडे सफेद रंगाची ऑडी ए ८ ही महागडी कारही आहे. त्याने ती गाडी स्वत:च्या गरजांनुसार बनवून घेतली आहे. त्याशिवाय त्याच्याकडे लाल रंगाची ऑडी ८ आणि मसिर्डीज बेंझ जी ६३ सुध्दा आहे. रणबीर महागडया गाडयांचा शौकीन आहे. 
कतरिना बरोबरचे प्रेम प्रकरण तुटल्यापासून दोघेही सतत माध्यमांमध्ये चर्चेत आहे. कतरिनाच्या आधारासाठी सलमानचा हात पुढे आला आहे तर, रणबीरने मात्र असा कुठलाही भावनिक आधार शोधलेला नाही किंवा त्याला कोणी तसा आधार अजून दिलेला नाही. 

Web Title: New Romance in Ranbir's Life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.