'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत नवा ट्विस्ट, नंदिता वहिनीला समजणार का राजा-राणाचं गुपित?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 03:30 PM2019-08-22T15:30:45+5:302019-08-22T15:32:05+5:30

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेला राजाच्या एन्ट्रीमुळे एक वेगळंच रूप आलं.

New twist in Tuzyat Jeev Rangala serial | 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत नवा ट्विस्ट, नंदिता वहिनीला समजणार का राजा-राणाचं गुपित?

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत नवा ट्विस्ट, नंदिता वहिनीला समजणार का राजा-राणाचं गुपित?

googlenewsNext

लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखांवर संबंध महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. मालिका आता एका वेगळ्या वळणावर पोहचली आहे. नुकतंच मालिकेत राजा राजगोंडाची एंट्री झालेली प्रेक्षकांनी पाहिली. राजाच्या एन्ट्रीमुळे मालिकेला एक वेगळंच रूप आलं. राणाचा राजा कसा झाला हे प्रेक्षकांना नुकतंच कळलं. मात्र वहिनीसाहेब यांना राजाच राणा आहे, हे माहित नाही. मात्र झी मराठीने सोशल मीडियावर तुझ्यात जीव रंगलाचा नवा प्रोमो शेअर केला आहे. ज्यात वहिनीसाहेबांना राजा राजगोंडाच राणा असल्याचं समजताना दिसतं आहे.


राजा राजगोंडाची एन्ट्री होण्यापूर्वी मालिकेत नंदिता वहिनी राणाला जीवे मारायची योजना आखते. त्यामुळे नंदिता वहिनीला धडा शिकवण्यासाठी राणादा राजा राजगोंडा बनून येतो. झी मराठीने प्रदर्शित केलेल्या नव्या प्रोमो दाखल झाला आहे.

हा प्रोमो या मालिकेत अंजली पाठक म्हणजेच अक्षया देवधरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये राणादाचा मित्र बरकत व पप्या त्याला तू भामटा आहेस म्हणून तुला वेडवाकडं बोललो आणि जीवे मारणार होतो असं सांगतो. तर दुसरीकडे नंदिता वहिनीसाठी काम करणाऱ्यांना कळतं की राजा राजा नाही राणादा आहे. ते लगेच वहिनीसाहेबांना फोन करतात. मात्र त्या फोन उचलत नाहीत. त्यामुळे ते त्यांना मेसेज करतात. तो मॅसेज त्या पाहतात आणि त्यांना धक्का बसतो.  त्यात अद्याप अंजलीलादेखील राजाच राणा आहे, हे माहित नाही.


आता आागामी भागात नंदिता वहिनी राजा राजगोंडाच्या बाबतीत काय करते हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

Web Title: New twist in Tuzyat Jeev Rangala serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.