'हवी तेवढी दारू प्या, पण चरस-गांजा...', कॉन्सर्टदरम्यान चाहत्यांना काय म्हणाला यो यो हनी सिंग?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 02:56 PM2024-03-31T14:56:14+5:302024-03-31T14:56:41+5:30

हनी सिंगचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

NewsYo Yo Honey Singh Giving Advice About Not To Take Drugs Says It Ruined 5 Years Of His Life | 'हवी तेवढी दारू प्या, पण चरस-गांजा...', कॉन्सर्टदरम्यान चाहत्यांना काय म्हणाला यो यो हनी सिंग?

'हवी तेवढी दारू प्या, पण चरस-गांजा...', कॉन्सर्टदरम्यान चाहत्यांना काय म्हणाला यो यो हनी सिंग?

आपल्या हटके स्टाइल आणि रॅपसाठी ओळखला जाणारा प्रसिद्ध गायक म्हणजे हनी सिंग.  काही काळ बॉलिवूडपासून दूर राहिल्यानंतर हनीने संगीतविश्वात दमदार पुनरागमन केलं आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या त्याच्या गाण्यांना चांगला प्रतिसाद मिळाला.हनी सिंगच्या गाण्यांची जितकी चाहत्यांमध्ये चर्चा होत असते, त्याच्यापेक्षा कैकपटीने त्याच्या पर्सनल लाइफची चर्चा रंगताना पाहायला मिळते. यातच हनी सिंगचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो 
 आहे.

हनी सिंगने त्याच्या एका कॉन्सर्टदरम्यान चाहत्यांना गांजा-चरस या नशेपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दिसते की हनी सिंग म्हणतो,  'बहिणी आणि भावांनो तुम्ही सगळे माझ्या लहान भावंडासारखे आहात. हे गांजा वगैरे काही फुकू नका. या व्यसनामुळे माझ्या आयुष्यातील पाच वर्षे वाया गेली आहेत. तुम्ही हवी तेवढी दारू प्या. पण चरस-गांजा ओढू नका. माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय'. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

हनी सिंग समावेश आज श्रीमंत गायकांच्या यादीत केला जातो. हनी सिंगचे चाहते फक्त भारतापुरतेच मर्यादित नसून जगभर पसरलेले आहेत. विशेष म्हणजे तो प्रचंड लक्झरी लाइफ जगतो. हनी सिंगने आपल्या करिअरमध्ये  'ब्राऊन रंग', 'देसी कलाकर', 'ब्लू आईज' सारखी सुपरहिट गाणी दिली. यानंतर अचानक संगीतक्षेत्रातून हनी सिंग गायब झाला.   दारू आणि इतर अंमली पदार्थांच्या आहारीही तो गेला होता. बायपोलर डिसऑर्डरचा सामना करत होता. अनेक वर्ष तो यावर उपचार घेत होता, त्याला रिहॅब सेंटरमध्येही जावे लागले. आता पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकण्यासाठी हनी सिंग सज्ज झाला आहे. 
 

Web Title: NewsYo Yo Honey Singh Giving Advice About Not To Take Drugs Says It Ruined 5 Years Of His Life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.