निक्की तांबोळीने अरबाजसोबत मिळून सूरजला केला व्हिडिओ कॉल; म्हणाली, "भावा लवकरच..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 11:29 AM2024-10-28T11:29:11+5:302024-10-28T11:34:27+5:30

निक्कीने व्हिडिओ कॉलचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. 

Nikki Tamboli along with Arbaz Patel makes a video call to suraj chavan says bhava meet soon | निक्की तांबोळीने अरबाजसोबत मिळून सूरजला केला व्हिडिओ कॉल; म्हणाली, "भावा लवकरच..."

निक्की तांबोळीने अरबाजसोबत मिळून सूरजला केला व्हिडिओ कॉल; म्हणाली, "भावा लवकरच..."

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा (Bigg Boss Marathi 5)  शेवट होऊन काहीच दिवस झालेत. घराबाहेर आल्यानंतर सर्व मंडळी एकमेकांच्या घरी जात भेटीगाठी करत आहेत. बिग बॉस विजेता सर्वांचा लाडका सूरज चव्हाणचीही (Suraj Chavan) सगळे आपुलकीने विचारपूस करत आहेत. अंकिता, आर्या यांच्यानंतर आता निक्की तांबोळीनेही (Nikki Tamboli) सूरजला व्हिडिओ कॉल केला. सोबत अरबाज पटेलही होता. निक्कीने व्हिडिओ कॉलचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. 

सूरज चव्हाण बिग बॉसचा विजेता झाला आणि त्यानंतर त्याच्याभोवती अक्षरश: चाहत्यांचा गोतावळा तयार झाला. त्यातच आता सूरजचं घराचं स्वप्न पूर्ण होत आहे. दोन दिवसांपूर्वीच भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पडला. त्याला शुभेच्छा देण्यासाठी अंकिता, आर्या जाधवने व्हिडिओ कॉलही केला होता. तसंच इरिना आणि वैभव तर त्याच्या घरी जाऊन त्याला भेटले होते. या सगळ्यात निक्की तांबोळी मात्र सूरजला विसरली की काय अशी चर्चा झाली. मात्र निक्कीनेही सूरजला व्हिडिओ कॉल केल्याचं दिसतंय. निक्कीने व्हिडिओ कॉलचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. तिच्यासोबत अरबाज पटेलही दिसत आहे. ती लिहिते, 'भावा लवकरच भेटू'. 

घरात असताना निक्कीनेही सूरजला खूप सपोर्ट केला. त्याला वेळोवेळी मदत केली. मूळचा बारामतीचा असलेला सूरज सध्या 'बिग बॉस'नंतर त्याच्या गावी कुटुंबासह वेळ घालवत आहे. सूरजने कोणाच्याही पाठिंब्याशिवाय आजच्या घडीला त्याने मोठं यश मिळवलं आहे. आता चाहते त्याच्या 'झापूक झुपूक' सिनेमाची वाट पाहात आहेत.

Web Title: Nikki Tamboli along with Arbaz Patel makes a video call to suraj chavan says bhava meet soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.