"अरबाजचा साखरपुडा झालाय वाटतं", आईचा मोठा गौप्यस्फोट ऐकून हादरली निक्की! अरबाजचे कपडे घेतले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 11:55 AM2024-09-27T11:55:45+5:302024-09-27T11:56:13+5:30

आज फॅमिली वीकमध्ये निक्की तांबोळीची आई घरात येणार आहे. आईने अरबाजबद्दल मोठा खुलासा केल्याने निक्की चांगलीच हादरलेली दिसतेय (bigg boss marathi 5)

nikki tamboli mother told about arbaz patel engagement then nikki tamboli angry and thrown arbaz patel clothes | "अरबाजचा साखरपुडा झालाय वाटतं", आईचा मोठा गौप्यस्फोट ऐकून हादरली निक्की! अरबाजचे कपडे घेतले अन्...

"अरबाजचा साखरपुडा झालाय वाटतं", आईचा मोठा गौप्यस्फोट ऐकून हादरली निक्की! अरबाजचे कपडे घेतले अन्...

बिग बॉस मराठीच्या घरात सध्या फॅमिली वीक सुरु आहे.  यामध्ये काल अभिजीत सावंत, धनंजय पोवार,  वर्षा उसगांवकर आणि जान्हवी किल्लेकर यांची फॅमिली त्यांना भेटायला आली. आज बिग बॉसच्या घरात निक्की तांबोळीची आई येताना दिसणार आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला आहे. अरबाजविषयी निक्कीच्या आईने मोठा गौप्यस्फोट केल्याने  निक्कीला चांगलाच धक्का बसलाय.

निक्कीच्या आईचा मोठा गौप्यस्फोट

आज बिग बॉस मराठीच्या घरात एक धक्कादायक गोष्ट घडणार आहे. निक्कीच्या आईची बिग बॉसच्या घरात एन्ट्री होणार आहे. "अरबाजचं चुकीचं चाललंय. त्याने असं नाही करायला पाहिजे. त्याचा साखरपुडा झालाय असं म्हणतात.." असं निक्कीच्या आईने तिला सांगितलं. हे ऐकताच निक्कीला मोठा धक्का बसला. पुढे निक्की जान्हवीजवळ जाऊन म्हणते की, "मी आता सांगते बिग बॉसला तो आला तर मी मेंटली पागल होईल."


निक्कीने अरबाजचे कपडे उचलले अन्...

पुढे निक्की जान्हवीला म्हणते की, "हे अरबाज - निक्की जे होतं ना ते आता संपलंय." पुढे निक्की अरबाजचे कपडे एका काळ्या पिशवीत भरते. निक्की बिग बॉसला कॅमेरात म्हणते की,  "हे अरबाजचे कपडे आहेत. फेकून द्या." अशाप्रकारे निक्कीने तिचा राग व्यक्त केलाय. यामुळे फिनालेमध्ये जेव्हा अरबाज समोर येईल तेव्हा निक्कीची काय प्रतिक्रिया असणार,  याकडे सर्वांचं लक्ष आहे.  आज बिग बॉस मराठीच्या घरात सूरज, निक्की, पॅडी, अंकिता यांचंं कुटुंब येताना दिसणार आहे

Web Title: nikki tamboli mother told about arbaz patel engagement then nikki tamboli angry and thrown arbaz patel clothes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.