निक्की तांबोळीची लांबलचक पोस्ट; म्हणाली, "जर कोणी तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 04:13 PM2024-10-20T16:13:28+5:302024-10-20T16:21:53+5:30

आधीची निक्की आणि आताची निक्की कशी वेगळी आहे हे तिने सांगितलं.

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये (Bigg Boss Marathi Season 5) सर्वात जास्त चर्चा झाली ती निक्की तांबोळीची (Nikki Tamboli). दिसायला सुंदर, सुडौल अशी निक्की बोलायला तितकीच तिखट होती.

निक्कीची घरात सगळ्यांसोबतच भांडणं झाली. तिची आणि अरबाजची लव्हस्टोरी गाजली. तसंच अरबाजसोबत मिळून तिने सुंदररित्या टास्क खेळले. याच जोरावर ती टॉप ३ पर्यंत पोहोचली.

निक्कीने आता नुकतंच एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. आधीची निक्की आणि आताच्या निक्कीमध्ये किती फरक झालाय हे तिने शेअर केलं आहे.

आपले बिग बॉसमधले काही फोटो शेअर करत ती लिहिते, "मी यापुढे कधीच स्वत:वर अविश्वास दाखवणार नाही. कोणी मला समजून घेत नाही किंवा माझ्यावर प्रेम करत नाही वा माझं कौतुक करत नाही म्हणून मी स्वत:ला दोष देणार नाही. माझी किंमत ही त्यांच्या मतावर ठरत नाही.

"मला माहितीये की माझं काय टॅलेंट आहे. त्यात मी माहीर आहे. पुढच्या वेळी जर कोणी तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा की आत्मविश्वास हा नेहमी शांत असतो आणि इर्ष्या ही जोरात ऐकू येणारी असते."

"स्त्रिया जन्मत:च स्ट्राँग नसतात. त्यांच्या आयुष्यातील खाचखळग्यांमुळे त्या तशा बनतात. त्या योद्धा असतात सोबतच त्यांचं मन सोन्याचं असतं. जिथे तुम्ही रडलात तिथे जाऊन हसा. जिथे हरलात तिथे जिंका. ज्यांनी तुमच्यावर अविश्वास दाखवला त्यांच्यासमोर आत्मविश्वासाने जा. तुमचा इतिहास तुम्हीच लिहा."

तर ही बिग बॉस मराठी सीझन ५ ची महाराणी आता घराच्या बाहेर आल्यावरही चर्चेत आहे. तिचा 'बाईsss काय हा प्रकार' हा डायलॉग तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच बोलताना दिसत आहेत.