डोन्ट वरी बाबा...! निळू फुलेंसाठी लेकीची भावनिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 01:17 PM2020-07-14T13:17:20+5:302020-07-14T13:20:22+5:30

प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या निळू फुलेंच्या स्मृतीदिनी अनेकांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. त्यांची लेक गार्गी फुले थत्ते हिनेही सोशल मीडियावर पोस्ट लिहिली.

nilu phule daughter gargi phule thatte emotional post | डोन्ट वरी बाबा...! निळू फुलेंसाठी लेकीची भावनिक पोस्ट

डोन्ट वरी बाबा...! निळू फुलेंसाठी लेकीची भावनिक पोस्ट

googlenewsNext
ठळक मुद्देझी मराठीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेत गार्गीने मिसेस निमकरांची अर्थात इशाच्या आईची भूमिका साकारली होती.

मराठी चित्रपटसृष्टीत नायक ते खलनायक असा प्रवास करणारे ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांना जाऊन काल 11 वर्षे पूर्ण झालीत. 13 जुलै 2009 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली होती. आपल्या रांगड्या आवाजाने आणि दमदार अभिनयाने 40 वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या निळू फुलेंच्या स्मृतीदिनी अनेकांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. त्यांची लेक गार्गी फुले थत्ते हिनेही सोशल मीडियावर पोस्ट लिहिली. आय लव्ह यू बाबा... तू शरीराने लांब कुठेतरी गेलास पण मनाने अजूनही माझ्याबरोबर आहेस, असे गार्गीने लिहिले.

‘बाबा... आज तुला जाऊन 11 वर्षे झाली. शरीराने लांब कुठेतरी गेलास पण मनाने अजूनही माझ्याबरोबर आहेस आणि राहशील आणि संतत सांगत राहशील की नन्या बाकी कशीही रहा, कुठेही रहा पण समाजाचं आपण देणं लागतो हे विसरू नकोस. डोन्ट वरी बाबा, तू दिलेली माणुसकीची ही शिकवण मी कधीही विसरणार नाही.... आय लव्ह यू बाबा,’ असे गार्गीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

 गार्गी तिच्या बाबांचा अभिनयाचा वारसा पुढे चालवत आहे. झी मराठीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेत गार्गीने मिसेस निमकरांची अर्थात इशाच्या आईची भूमिका साकारली होती. निळू फुले गार्गीला नेहमी सांगायचे की, तू कॅमे-यामसमोर असशील तेव्हा स्वत:ला अमिताभ बच्चन आहेस असे समज. तुझ्यासमोर कितीही मोठा दिग्गज कलाकार असला तरी तुझा स्वत:चा अभिनय दमदार असलाच पाहिजे. गार्गीने बाबांची ही शिकवण लक्षात ठेवली आहे. एका मुलाखतीत तिने याबद्दल सांगितले होते. 

 

Web Title: nilu phule daughter gargi phule thatte emotional post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.