"...तेव्हा आमच्या सारख्या छोट्या लोकांचा कॉन्फिडन्स हलतो! ब्लँक व्हायलं होतं!’’, हेमांगी कवीची भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 05:04 PM2023-08-02T17:04:44+5:302023-08-02T17:05:50+5:30

Nitin Chandrakant Desai: अभिनेत्री हेमांगी कवी यांनीही सोशल मीडियावर पोस्ट लिहित नितीन देसाई यांना आदरांजली वाहिली आहे. तसेच त्यांच्या अकाली जाण्यामुळे धक्का बसल्याची भावूक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Nitin Chandrakant Desai: "...then the confidence of small people like us is shaken! It had to be blank!'', Hemangi Kavi's emotional post | "...तेव्हा आमच्या सारख्या छोट्या लोकांचा कॉन्फिडन्स हलतो! ब्लँक व्हायलं होतं!’’, हेमांगी कवीची भावूक पोस्ट

"...तेव्हा आमच्या सारख्या छोट्या लोकांचा कॉन्फिडन्स हलतो! ब्लँक व्हायलं होतं!’’, हेमांगी कवीची भावूक पोस्ट

googlenewsNext

बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टी आणि मालिकांमधील प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आज पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन जीवन संपवल्याने खळबळ उडाली आहे. नितीन चंद्रकांत देसाई यांनी त्यांच्या कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेतला. त्यांच्या अकाली जाण्यानंतर विविध क्षेत्रातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे, तसेच त्यांच्या अकाली जाण्यावर प्रतिक्रियाही व्यक्त होत आहेत.  अभिनेत्री हेमांगी कवी यांनीही सोशल मीडियावर पोस्ट लिहित नितीन देसाई यांना आदरांजली वाहिली आहे. तसेच त्यांच्या अकाली जाण्यामुळे धक्का बसल्याची भावूक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

त्या आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या की, जेव्हा इतक्या मोठ्या नावाच्या माणसाचा अंत असा होतो तेव्हा मनात प्रश्नांचं काहूर माजतं. मन उत्तरं शोधू लागतं. ती मिळत नाहीतच. मग आपण जरतरच्या गोष्टी बोलू लागतो. काही बाही धंडाळू लागतो. काय ते कळत ही नाही!  पोटात खड्डा पडला बातमी ऐकून! मनात, अंगात थरथर आहे. आत खोलवर धडधडतंय आताही हे लिहीताना! नितीन सर! तुम्ही आदर्श, उदाहरण होतात आमच्या सारख्या लोकांसाठी! स्वप्न मोठी कशी बघायची ती सत्यात कशी उतरवायची याचं! भव्यदिव्यतेचं प्रतिक होतात! ‘होतात’ हा शब्द लिहावा लागतोय आज! छे! 

२०१६ मध्ये माझा दादा फोर्टिस हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होता! समोरच्या बेडवर तुम्ही होतात. तेव्हा मी तुम्हांला पहील्यांदा भेटले होते. माझा दादाचं नाव नितीन, वडलांचं नाव चंद्रकांत. हे जेव्हा मी तुम्हांला सांगितलं तेव्हा म्हणाला होतात “अरे, म्हणजे देसाई आणि कवी चाच काय तो फरक! बघा हं, दोघांची औषधं, उपचार इकडे तिकडे व्हायची.” हे ऐकून डॉक्टर आणि नर्ससकट आम्ही हसलो होतो. आज पटकन तेच आठवलं! 

प्रत्येक माणूस जाणारच आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण जेव्हा इतका यशस्वी, हिंदी सिनेमा, मालिका वरर्तूळात नाव कमवलेला, ते नाव टिकवून ठेवलेला मराठी माणूस आपलं आयुष्य असं संपवतो तेव्हा आमच्या सारख्या छोट्या लोकांचा कॉन्फिडन्स हलतो! ब्लँक व्हायलं होतं!  असा निर्णय घेताना तुमचं काय झालं असेल याचा किंचितसा अंदाज ही कुणी लावू शकणार नाही. पण आता जिथे कुठे असाल तिथे शांत असाल. या materialistic जगाच्या सगळ्या गराड्यातून दूर, मुक्त!, अशा शब्दात हेमांगी कवी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

Web Title: Nitin Chandrakant Desai: "...then the confidence of small people like us is shaken! It had to be blank!'', Hemangi Kavi's emotional post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.