'एखादा पोलिसवाला कितीही corrupt असला तरी..'; मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 03:30 PM2023-10-15T15:30:59+5:302023-10-15T15:49:58+5:30
Milind gawali: मिलिंद गवळी बऱ्याचदा त्यांनी साकारलेल्या भूमिकेविषयी म्हणजेच अनिरुद्ध देशमुख विषयी पोस्ट लिहित असतात.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे मिलिंद गवळी. नाटक, मालिका आणि सिनेमा अशा प्रत्येक माध्यमांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. सध्या ते आई कुठे काय करते या मालिकेत काम करत आहेत. मिलिंद गवळी सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय आहेत. त्यामुळे ते कायम नवनवीन पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात.
मिलिंद गवळी बऱ्याचदा त्यांनी साकारलेल्या भूमिकेविषयी म्हणजेच अनिरुद्ध देशमुख विषयी पोस्ट लिहित असतात. ही भूमिका नेमकी कशी आहे, त्या भूमिकेमागची वृत्ती कशी आहे हे ते सांगायचा प्रयत्न करत असतात. यावेळी सुद्धा त्यांनी या भूमिकेविषयीच भाष्य केलं आहे.
काय आहे मिलिंद गवळींची पोस्ट?
अनिरुद्ध देशमुख ज्यावेळेला असा stand घेतो त्यावेळेला अनेकांच्या मनामध्ये आणि माझ्या मनामध्ये पण असा विचार येतो की आता या माणसाचं काय करायचं, माणूस इतका चांगला पण वागू शकतो?, असा प्रश्न आल्या शिवाय राहत नाही, अनिरुद्धच नाव इतकं बदनाम झालं आहे, की तो जे करेल ते चुकीचं आहे असं मनामध्ये भावना येणं साहजिक आहे, काही काही situations मध्ये हा माणूस अगदी हिरो सारखाच वागतो, surprise करतो सगळ्यांना. मी पण ज्या वेळेला script वाचतो त्यावेळेला नकळत माझ्या चेहऱ्यावर एक smile येतं आणि मन भरून येतं, डोळे सुद्धा भरून येतात, मनातल्या मनात नमिता वर्तक हिला thank you सुद्धा म्हणत असतो,पण खरंच आहे किती वाईट माणूस असला तरी काही काही बाबतीत माणसाने ठांब भूमिका घ्यायलाच हवी , योग्य माणसांना साथ द्यायलाच हवी,
मुंबई पोलिसांच्या बाबतीत एक खूप चांगली गोष्ट ऐकली आहे, ती म्हणजे खात्यामध्ये corruption आहे, पण एखादा पोलिस वाला कितीही corrupt असला तरी असं म्हटलं जातं की Rape ,Murder, Drink & Drive आणि drugs या cases मध्ये कुठलाही पोलिसवाला कधीही तो पैसे खात नाही , गुन्हेगाराला कधीही साथ देत नाही, कदाचित अनिरुद्ध देशमुखचं असंच काहीतरी असावं. या scene मध्ये ज्यावेळेला तू आरोहीची बाजू घेऊन बोलतो, जे प्रत्येकाने करायला हवं तेच करतो, त्यावेळेला खरंच अनिरुद्ध साकारायला मला मजा येते. मला रोज अनिरुद्धची एक नव्याने ओळख होत जाते, आणि पुन्हा एकदा त्या अनिरुद्ध देशमुखच्या प्रेमात पडावसं वाटतं. हा अनिरुद्ध देशमुख नमिता वर्तक आणि राजनजी शाही यांच्या विचाराने घडत जात असतो, खरं तर माझ्या हातात काहीच नाहीये, लोकं मला त्या भूमिकेसाठी ओळखतात, पण अनिरुद्ध देशमुख हे तेच घडवत असतात, प्रेक्षकांसारखा मी सुद्धा आतुरतेने वाट बघत असतो की आता अनिरुद्धची काय भूमिका आहे.