'मूल आणि लग्न करणं गरजेचं नाही', काजोलची बहिण तनिषाने घेतला 'हा' मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 07:57 PM2021-07-06T19:57:54+5:302021-07-06T19:58:42+5:30
तनिषाला तिची आई म्हणजेच अभिनेत्री तनुजा यांनी तिच्या निर्णयात पाठिंबा दिला आहे.
बॉलिवूडमध्ये काही काळासाठी सेलिब्रिटींमध्ये एग्ज फ्रीज करण्याचा ट्रेंड वाढल्याचा पहायला मिळाला होता. एकता कपूर, मोना सिंग ते राखी सावंतपर्यंत अशा बऱ्याच सेलिब्रिटींनी आपले एग्ज फ्रीज केले आहेत. आता बॉलिवूड अभिनेत्री काजोलची धाकटी बहीण आणि अभिनेत्री तनिषा मुखर्जीने देखील एग्ज फ्रीज केले आहेत. तनिषाने सांगितले की वयाच्या ३३ व्या वर्षी तिला एग्ज फ्रीज करण्याची इच्छा होती, मात्र तिच्या डॉक्टरांनी तिला असे करण्यास नकार दिला.
‘ईटाइम्स’च्या रिपोर्टनुसार, तनिषा मुखर्जीने सांगितले की, मला वयाच्या ३३ व्या वर्षी माझे एग्ज फ्रीज करायचे होते. त्यासाठी जेव्हा मी माझ्या डॉक्टरांकडे गेली. त्यावेळी त्यांनी मला असे न करण्याचा सल्ला दिला होता. जेव्हा मी आई होऊ शकत नाही याची कल्पना त्यांना आली तेव्हा डॉक्टरांनी मला एग्ज फ्रीज करण्याचा सल्ला दिला. हा माझा खासगी निर्णय आहे आणि मूल असणे गरजेच नाही.
ती पुढे म्हणाली, ‘मूल होणे हेच उद्दीष्ट स्त्रीच्या जीवनाचे नाही. एखाद्या महिलेला मूल नसेल तर काही हरकत नाही. लग्न करणे किंवा कोणासोबत रिलेशनशीपमध्ये असणे गरजेचे नाही.’
एग्ज फ्रीज करण्यावर तनिषाची आई तनूजा यांची प्रतिक्रिया काय होती, हेदेखील तनिषाने सांगितले. ती म्हणाली की, ‘माझी आई माझ्या प्रत्येक निर्णयावर माझ्यासोबत असते.’