विराट कोहलीचं टेन्शन खल्लास, स्पृहा जोशीने दूर केली भारतीय क्रिकेट संघाची मोठी डोकेदुखी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 10:56 AM2019-06-28T10:56:45+5:302019-06-28T11:00:12+5:30
चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाची समस्या कशी सोडवायची? माझा विचार करायलाही काय हरकत नाही अशी कॅप्शन तिने या फोटोला स्पृहाने दिली आहे.
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताची धडाकेबाज कामगिरी सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या प्रत्येक सामन्यात विराट सेनेनं चमकदार कामगिरी करत विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. एकीकडे विजयी वाटचाल सुरू असली तरी गेल्या दोन सामन्यात भारतीय क्रिकेट संघ आणि चाहत्यांना एक वेगळी चिंता सतावतेय. सलामीवीर बाद झाल्यानंतर डाव सावरायची जबाबदारी असलेला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरणारा विजय शंकर गेल्या दोन्ही सामन्यात लवकर बाद झाला. त्यामुळे भारताचा चौथ्या क्रमांकाचा फलंदाज कोण अशी चिंता भारतीय संघ व्यवस्थापन आणि भारतीय क्रिकेट रसिकांना सतावतेय. हाच धागा पकडत मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशीने ट्विटरवर एक फोटो पोस्ट केलाय.
How to solve No. 4 🏏 problem...माझाही विचार करायला हरकत नाही 😉😝🤣#ICCCricketWorldCup#INDvsWIpic.twitter.com/1ABQKLHHJX
— Spruha Joshi (@spruhavarad) June 27, 2019
यांत स्पृहा फलंदाजी करताना दिसत आहे. या फोटोला तिने कॅप्शन दिले आहे. चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाची समस्या कशी सोडवायची? माझा विचार करायलाही काय हरकत नाही अशी कॅप्शन तिने या फोटोला दिली आहे. त्यामुळे चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत भारतीय संघाची डोकेदुखी दूर करायला आपण सज्ज असल्याचे स्पृहाने म्हटले आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि प्रतिभावंत अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशीची ओळख आहे.. आपल्या अभिनयाने स्पृहाने रसिकांची मनं जिंकली आहेत. मोरया, पैसा पैसा यासह विविध चित्रपटातील भूमिकांमधून स्पृहाने आपल्या अभिनयाची छाप पाडली. याशिवाय छोट्या पडद्यावरही मालिकांमधून तिने जादू दाखवली आहे. स्पृहा सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. सोशल मीडियावर ती आपले फोटो आणि कविता तसंच विचार शेअर करत असते. अभिनय, कविता यासहव क्रिकेटही तिला आवडतं. केवळ ते आवडतच नाही तर या खेळातील प्रत्येक लहानसहान गोष्टींची माहिती असल्याचे स्पृहाने या पोस्टद्वारे दाखवून दिलं आहे.