Flashback : कुठल्याच हिरोला ‘हिरोईन’ म्हणून नको होती ही अभिनेत्री, पुढे बनली स्टार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 08:00 AM2019-09-16T08:00:00+5:302019-09-16T10:31:11+5:30
60 आणि 70 च्या दशकात एक हिरोईन फिल्म इंडस्ट्रीत एका मोठ्या संधीच्या शोधात होती. पण कुठलाही हिरो तिच्यासोबत काम करायला तयार नव्हता.
60 आणि 70 च्या दशकात एक हिरोईन फिल्म इंडस्ट्रीत एका मोठ्या संधीच्या शोधात होती. पण कुठलाही हिरो तिच्यासोबत काम करायला तयार नव्हता. पण काळ बदलला आणि पुढे याच हिरोईनसोबत काम करण्यासाठी अभिनेत्यांमध्ये चढाओढ लागली. ही हिरोईन दुसरी तिसरी कुणी नसून मुमताज होती. होय, आपल्या मनमोहक हास्याने आणि सौंदर्याने खिळवून ठेवणारी अभिनेत्री मुमताज.
आज मुमताज यांच्या सौंदर्याचे लाखो ‘दिवाने’ आहेत. पण एकेकाळी एकही हिरो त्यांच्यासोबत काम करण्यास तयार होईना. याचे कारण म्हणजे मुमताज यांनी केवळ वयाच्या 12 वर्षी बॉलिवूडमध्ये काम करणे सुरु केले होते. त्यांच्या कमी वयामुळे कुठलाही निर्माता-दिग्दर्शक इतकेच काय तर कुठलाही हिरो त्यांच्यासोबत काम करण्यास तयार नव्हता. त्याचमुळे मुमताज यांना सुरुवातीच्या काळात अनेक चित्रपटांत साईड हिरोईन म्हणून काम करावे लागले. पण याऊपरही मुमताज यांनी स्वत:ची छाप सोडली. आता तरी आपल्याला लीड हिरोईनची भूमिका मिळेल, असे मुमताज यांचा अंदाज होता.
पण झाले उलटेच. त्यांचा संघर्ष सुरुच होताच. इतका की, अनेक खस्ता खाल्लयानंतर मुमताज यांनी बी- ग्रेड चित्रपटांचा आधार घ्यावा लागला. यादरम्यान मुमताज यांनी 16 अॅक्शन चित्रपट केलेत. यात त्या दारा सिंग यांच्यासोबत झळकल्या. ही जोडी लोकांना आवडली आणि या जोडीचे 10 चित्रपट हिट ठरले. पण या अॅक्शन चित्रपटांमुळे मुमताज यांची प्रतीमा स्टंट हिरोईन अशी झाली. अशा स्थितीतही मुमताज ए-ग्रेड चित्रपटांत काम मिळवण्यासाठी प्रयत्न करत होत्या. पण तरीही कुणीही त्यांच्यासोबत काम करण्यास तयार नव्हते. इतके की, धर्मेन्द्र आणि शशी कपूर यांनीही मुमताज यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला.
पण मुमताज यांनी हार मानली नाही. त्यांनी पुन्हा ए-ग्रेड चित्रपटांत सपोर्टींग रोल सुरु करणे सुरु केले. काजल, खानदान, मेरे सनम आणि पत्थर के सनम यासारख्या चित्रपटात मुमताज यांनी साईड रोल केलेत. अखेर मुमताज यांना राजेश खन्ना यांच्यासोबत लीड हिरोईन म्हणून संधी मिळाली आणि ही जोडी कमालीची गाजली. या जोडीने दो रास्ते, सच्चा झूठा, आपकी कसम, अपना देश, प्रेम कहानी, दुश्मन, बंधन, रोटी अशा यशस्वी चित्रपटांत काम केले. यानंतर मुमताज यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.