"मला गोल्ड डिगर म्हणायचे", सुकेश चंद्रशेखर प्रकरणात नोराचे जॅकलिनवर आरोप, म्हणाली, "तिच्यामुळे..."
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 04:07 PM2023-08-03T16:07:45+5:302023-08-03T16:08:03+5:30
२०० कोटींच्या मनी लॉड्रिंगप्रकरणात तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरशी जॅकलिन आणि नोराचे संबंध असल्याचं समोर आलं होतं.
नोरा फतेही ही अभिनेत्रीबरोबरच उत्तम डान्सरही आहे. अभिनयाबरोबरच नोरा तिच्या बोल्डनेससाठीही ओळखली जाते. २०० कोटींच्या मनी लॉड्रिंगप्रकरणात तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखर प्रकरणात नोरा आणि जॅकलिन फर्नांडिसचं नाव समोर आलं होतं. नोराची या प्रकरणी ईडीकडून चौकशीही करण्यात आली होती. या प्रकरणी नोराने जॅकलिनवर मानहानीचा खटला दाखल केला होता. सोमवारी(३१ जुलै) या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान नोराने मीडियाशी संवाद साधला.
नोरा म्हणाली, "सुकेश चंद्रशेखरबरोबर असलेल्या रिलेशनशिपममुळे त्यांनी मला दोषी ठरवलं होतं. ते मला गोल्ड डिगर म्हणायचे. या प्रकरणात काही लोकांना वाचवण्यासाठी मला अडकवलं गेलं. मी बाहेरची असल्यामुळे त्यांना मला टार्गेट करणं सोपं होतं. यामुळे करिअरमध्ये माझं मोठं नुकसान झालं आहे. मला या सगळ्याची भरपाई हवी आहे. ईडी याबाबत माझी चौकशी का करत आहे, असा प्रश्न जॅकलिनने उपस्थित केला होता. तिच्या या वक्तव्यामुळे माझी बदनामी झाली आहे."
दोन्ही पत्नींबरोबर एकाच घरात राहतात सलीम खान, सावत्र आईबाबत अरबाज म्हणाला, "हेलन यांनी..."
नोराने डिसेंबर २०२२ मध्ये जॅकलिन विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. "तुझं करिअर उद्ध्वस्त करेन", असं जॅकलिन म्हणाल्याचं नोराने सांगितलं होतं. दरम्यान, सुकेश चंद्रशेखरने नोरा आणि जॅकलिनला महागडे गिफ्ट दिल्याचं समोर आलं होतं. याशिवाय सुकेश आणि जॅकलिनचे प्रेमसंबंध असल्याचा खुलासाही त्याने केला होता.