प्रभासने शोधली ‘दुल्हनिया’, अनुष्का शेट्टी नाही या बिझनेसमॅनच्या लेकीला दिला होकार!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2021 04:29 PM2021-02-07T16:29:17+5:302021-02-07T16:31:12+5:30

होय, प्रभास लवकरच लग्न करणार आहे. पण अनुष्का शेट्टीसोबत नाही तर...

Not anushka shetty but prabhas to marry an nri businessman daughter | प्रभासने शोधली ‘दुल्हनिया’, अनुष्का शेट्टी नाही या बिझनेसमॅनच्या लेकीला दिला होकार!!

प्रभासने शोधली ‘दुल्हनिया’, अनुष्का शेट्टी नाही या बिझनेसमॅनच्या लेकीला दिला होकार!!

googlenewsNext
ठळक मुद्देमध्यंतरी प्रभास आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांच्या अफेअरच्या वावड्या उठल्या होत्या. पण प्रभासने या बातम्या फेटाळून लावल्या होत्या.

साऊथ अभिनेता प्रभास सध्या बॅक टू बॅक सिनेमांमुळे चर्चेत आहे. पण म्हणून त्याच्या लव्ह लाईफची चर्चाही कमी नाही. प्रभास हा साऊथचा ‘मोस्ट हँडसम बॅचलर’ मानला जातो. एकीकडे लाखो तरूणींच्या ‘दिल की धडकन’ असलेला प्रभास अद्यापही अविवाहित आहे. दुसरीकडे साऊथची हसीना अनुष्का शेट्टी हिने सुद्धा अद्याप लग्न केलेले नाही. ‘बाहुबली’त अनुष्का व प्रभासच्या  केमिस्ट्रीने देशभर आग लावली होती. तेव्हापासून प्रभाससोबत अनुष्काचे नाव जोडले जाते.  अनुष्का व प्रभासच्या अफेअरच्या चर्चा अधुनमधून सुरु असतात, त्या म्हणूनच. पण एक अशी बातमी कानावर येतेय. ती ऐकून प्रभास व अनुष्काच्या चाहत्यांची निराशा होईल.

होय, प्रभास लवकरच लग्न करणार आहे. पण अनुष्का शेट्टीसोबत नाही तर त्याची होणारी वधू एनआरआय असल्याचे कळतेय. टॉलिवूड डॉट नेटने दिलेल्या वृत्तानुसार, प्र्रभास अमेरिकास्थित एका सॉफ्टवेअर कंपनीच्या फाऊंडरच्या मुलीशी लग्न करणार आहे. हे अरेंज मॅरेज असणार आहे. दोन्ही कुटुंबांनी शिवाय प्रभासने या स्थळाला होकार दिल आहे. चर्चा खरी मानाल तर या लग्नाची तयारीही सुरु झालीये.
‘राधेश्याम’ या सिनेमाच्या रिलीजनंतर प्रभास लग्नबेडीत अडकणार, अशी चर्चा आहे.


 

मध्यंतरी प्रभास आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांच्या अफेअरच्या वावड्या उठल्या होत्या. पण प्रभासने या बातम्या फेटाळून लावल्या होत्या. आम्ही केवळ चांगले मित्र आहोत, असे तो म्हणाला होता.
प्रभासचा ‘राधेश्याम’ हा आगामी सिनेमा   युव्ही क्रिएशन आणि गोपीकृष्ण मुव्हीज प्रोड्यूस करत आहेत.   या चित्रपटात प्रभासच्या अपोझिट अभिनेत्री पूजा हेगडेची वर्णी लागली आहे. प्रभासचा हा चित्रपटही हिंदी, तामिळ आणि तेलगू अशा तीन भाषांमध्ये तयार होणार आहे. 

Web Title: Not anushka shetty but prabhas to marry an nri businessman daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Prabhasप्रभास