बॉलिवूड, टॉलिवूड वगैरे नाही; आता प्रत्येक चित्रपट 'भारतीय सिनेमा'; करण जोहरनं सोडलं 'ब्रह्मास्त्र'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 07:25 PM2022-09-03T19:25:11+5:302022-09-03T19:25:48+5:30

Karan Johar: करण जोहरने नुकतेच एका इव्हेंटमध्ये भारतीय सिनेमाला टॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये विभाजित करण्याच्या कल्पनेवर हल्लाबोल केला आहे आणि आता प्रत्येक चित्रपट भारतीय सिनेमाचा असेल असे भावनिक आवाहन केले.

Not Bollywood, Tollywood etc; Now every movie is 'Indian Cinema'; Karan Johar urges audience | बॉलिवूड, टॉलिवूड वगैरे नाही; आता प्रत्येक चित्रपट 'भारतीय सिनेमा'; करण जोहरनं सोडलं 'ब्रह्मास्त्र'

बॉलिवूड, टॉलिवूड वगैरे नाही; आता प्रत्येक चित्रपट 'भारतीय सिनेमा'; करण जोहरनं सोडलं 'ब्रह्मास्त्र'

googlenewsNext

'ब्रह्मास्त्र' (Bramhastra) रिलीज होण्यापूर्वी हैदराबादमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, जिथे चित्रपटाशी संबंधित लोक जमले होते. चित्रपट निर्माते करण जोहर आणि एसएस राजामौली यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमात करण जोहर(Karan Johar)ने भारतीय सिनेमाच्या फुटीरतावादी विचारसरणीवर हल्ला चढवला. बॉलिवूड विरुद्ध दक्षिण सिनेमा या वादावर करण जोहरने आपले मत मांडले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, करण जोहरने भारतीय फिल्म इंडस्ट्रीकडे 'बॉलिवूड' किंवा 'टॉलिवूड' म्हणून पाहिले जाऊ नये, असा आग्रह धरला होता. ज्युनियर एनटीआर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होता. निर्मात्याने त्याचे आभार मानले, 'धन्यवाद जूनियर एनटीआर, तुम्ही तुमच्या उपस्थितीने आमचा सन्मान केला. तुमचा पाठिंबा आमच्यासाठी सर्वस्व आहे. आम्ही आमच्या पद्धतीने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत.


करण जोहर पुढे म्हणाला, 'जसे एसएस राजामौली सरांनी सांगितले आहे की हा भारतीय सिनेमा आहे. याला इतर कोणत्याही नावाने संबोधू नका. आम्ही त्याला बॉलीवूड, टॉलीवूड म्हणत राहतो.'' तो भावनिक आवाहन करत म्हणाला की, ''आपल्याला यातून बाहेर पडायचे आहे. भारतीय सिनेमाचा एक भाग असल्याचा आम्हाला अभिमान आहे. आता प्रत्येक चित्रपट भारतीय चित्रपटाचा असेल.
यापूर्वी केजीएफ स्टार यश यानेही भारतीय चित्रपटांचे विभाजन करू नका असे सर्वांना आवाहन केले होते. सर्व चित्रपट एक असून ते भारतीय चित्रपटसृष्टीचा भाग असल्याचे त्याने म्हटले होते. त्यानंतर आता करण जोहरनेही हेच सांगितले आहे. 

Web Title: Not Bollywood, Tollywood etc; Now every movie is 'Indian Cinema'; Karan Johar urges audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.