काय सांगता! 'रांझणा'साठी धनुष नाही तर हा अभिनेता होता पहिली पसंती, तुम्हाला माहितीये?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 01:30 PM2024-08-27T13:30:53+5:302024-08-27T13:32:07+5:30
'रांझणा' या गाजलेल्या सिनेमासाठी धनुष नव्हे तर या लोकप्रिय अभिनेत्याला झालेली विचारणा
"अब कौन साला फिरसे उठे, दिल लगवाने को, दिल तुडवाने को", अशा डायलॉगने फेमस झालेला 'रांझणा' सिनेमा एक आयकॉनिक सिनेमा म्हणून ओळखला जातो. या सिनेमातील गाणी, कथा, कलाकारांचा अभिनय अशा अनेक गोष्टींची चांगली चर्चा झाली. धनुष-सोनम कपूर-अभय देओल या जोडीने त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने 'रांझणा' गाजवला. पण तुम्हाला माहितीये का हा कलाकार कोण होता? जाणून घ्या.
धनुष नव्हे तर हा कलाकार होता 'रांझणा'ची पहिली पसंती
आनंद एल राय दिग्दर्शित 'रांझणा' सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमात धनुषने साकारलेल्या कुंदन या भूमिकेचं चांगलंच कौतुक झालं. 'रांझणा'च्या कुंदनसाठी धनुष नव्हे तर अभिनेता रणबीर कपूर पहिली पसंती होता. परंतु त्यावेळी रणबीरकडे उपलब्ध तारखा नव्हत्या. त्यामुळे सिनेमाच्या टीमने प्रमुख भूमिकेसाठी दुसऱ्या अभिनेत्याची शोधाशोध केली तेव्हा धनुषची निवड करण्यात आली. धनुषचा हा पहिलाच बॉलिवूड सिनेमा होता. धनुषने साकारलेली कुंदनची भूमिका चांगलीच लोकप्रिय ठरली.
Rewatching this masterpiece♥️
— Faiz akhtar (@FaizAkhtar264) August 22, 2023
At end dialogues of dhanush just made me cry..heart touching movie this reveals that defination of love for girls differs from time to time, place to place, but for boys it remains same at any situation at any time.#ranjhana#dhanushpic.twitter.com/Tt0ll7LQOT
Everything Ranbir wanted came to fruition
— RKᵃ (@seeuatthemovie) January 10, 2024
- 550 Cr Domestic and 904 Worldwide ✔️
- $30+ Million Overseas ✔️
- 3 CR+ FFs ✔️
- Pushing boundaries of character arcs, storytelling, & narrative ✔️ pic.twitter.com/ehgFBbapJL
'रांझणा' सिनेमाविषयी आणखी काही
२०१३ साली 'रांझणा' सिनेमा रिलीज झाला. ए.आर.रेहमान यांनी सिनेमाला संगीत दिलं होतं. 'तनु वेड्स मनू'नंतर आनंद एल राय यांच्या या सिनेमाची सर्वांना उत्सुकता होती. सिनेमा रिलीज झाला आणि अनपेक्षितपणे सिनेमाने जबरदस्त यश मिळवलं. प्रेक्षकांची पसंती + बॉक्स ऑफिसवर कमाई अशा दुहेरी कामगिरीत सिनेमा न्हाऊन निघाला. आजही या सिनेमातली गाणी, अभिनय, डायलॉग चाहत्यांच्या तोंडपाठ आहेत.