अभिनयाला नव्हे, तर दिसण्याला महत्त्व

By Admin | Published: April 18, 2017 11:39 PM2017-04-18T23:39:57+5:302017-04-18T23:39:57+5:30

किरण करमरकर यांनी दिनमान या मराठी मालिकेद्वारे त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर...

Not important for appearance, but the importance of viewing | अभिनयाला नव्हे, तर दिसण्याला महत्त्व

अभिनयाला नव्हे, तर दिसण्याला महत्त्व

googlenewsNext

- प्राजक्ता चिटणीस
किरण करमरकर यांनी दिनमान या मराठी मालिकेद्वारे त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर कहानी घर घर की, दामिनी, इतिहास यासारख्या हिंदी मालिकांमध्ये ते झळकले. कहानी घर घर की या मालिकेतील ओम या व्यक्तिरेखेमुळे त्यांना केवळ भारतातच नव्हे, तर जगभर लोकप्रियता मिळाली. ढाई किलो प्रेम या मालिकेत ते सध्या झळकत आहेत. या मालिकेच्या निमित्ताने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा...


ढाई किलो प्रेम या मालिकेत तुम्ही कोणत्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहात?
ल्ल या मालिकेत मी नायकाच्या वडिलांची भूमिका साकारत आहे. मी गेल्या वर्षी तमन्ना या मालिकेत काम केले होते. या मालिकेत मुलीला नेहमी पाठिंबा देणाऱ्या वडिलांची भूमिका मी साकारली होती. त्यामुळे मला त्याच प्रकारच्या भूमिका आॅफर केल्या जात होत्या; पण मला काहीतरी वेगळे साकारायचे होते. संदीप सिकंद हे या मालिकेचे निर्माते आहेत. कहानी घर घर की या मालिकेपासून त्यांना मी ओळखतो आणि त्यामुळे त्यांना मी मालिकेसाठी लगेचच होकार दिला. तसेच, या मालिकेची कथा मला खूप आवडली. माझी या मालिकेतील भूमिका गंमतशीर वाटल्याने मी या मालिकेत काम करायचे ठरवले. मी या मालिकेत माझ्या मुलाला कस्पटासमान वागवतो. अतिशय तिरसट बापाची भूमिका मी या मालिकेत साकारत आहे.

कहानी घर घर की ही मालिका तुमच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला, असे तुम्हाला वाटते का?
ल्ल कहानी घर घर की या मालिकेने मला एक चेहरा मिळवून दिला. या मालिकेने केवळ देशातच नव्हे, तर जगभरातील लोकांचे प्रेम मला मिळवून दिले. त्यामुळे ही मालिका माझ्यासाठी नेहमीच खास आहे. पण, मी माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला दामिनी या मालिकेत काम केले होते. या मालिकेआधी मी एक स्ट्रगलर अभिनेता होतो; पण या मालिकेने मला एक ओळख मिळवून दिली. तसेच फिल्मिस्तान स्टुडिओच्या बाहेर अनेक वर्षांपूर्वी मला इर्शाद हाश्मी भेटले होते. त्यांच्यामुळे माझा जाहिरात क्षेत्रात प्रवेश झाला. त्यामुळे या जाहिराती आणि दामिनी ही मालिका माझ्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला, असे मी म्हणेन.

हिंदीत काम करताना कधी भाषेचा अडसर आला नाही का?
ल्ल प्रत्येक भाषेची एक गती असते. भाषा बोलताना तुम्हाला त्याच गतीने बोलावे लागते. इतिहास ही मालिका मी अनेक वर्षांपूर्वी केली होती. या मालिकेचे दिग्दर्शक गोगी आनंद होते. त्यांनी मला हिंदी भाषा बोलताना कोणत्या गतीने ती बोलावी, यातील बारकावे शिकवले. त्यामुळे हिंदीत काम करताना कधीच भाषेचा अडसर जाणवला नाही.

गेली अनेक वर्षे तुम्ही छोट्या पडद्यावर काम करीत आहात. गेल्या अनेक वर्षांत छोट्या पडद्यावर काय बदल घडले आहेत?
ल्ल गेल्या काही वर्षांत छोट्या पडद्यावर प्रचंड पैसा आला आहे. त्यामुळे मालिकांचे भव्य सेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसेच कलाकारांना, तंत्रज्ञांना चांगला पैसा मिळत आहे. रंगभूषा, वेशभूषा यांवर प्रचंड पैसा खर्च केला जातो. पण, गेल्या काही वर्षांत छोट्या पडद्यावरील अभिनयक्षमता खालावली आहे, असे मला वाटते. काही नटांना तर साधे एक वाक्यदेखील बोलता येत नाही. हम लोग, बुनियाद यासारख्या मालिकांच्या काळात एकापेक्षा एक सरस अभिनेते आपल्याला पाहायला मिळत होते. पण, आता अभिनयापेक्षा दिसण्याला अधिक महत्त्व दिले जात आहे, असे मला वाटते.

Web Title: Not important for appearance, but the importance of viewing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.