रणवीरच नाहीतर कोट्यवधी रूपये कमवूनही विराट-अनुष्का राहतात भाड्याच्या घरात, महिन्याला देतात इतके भाडे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 11:05 AM2020-01-03T11:05:49+5:302020-01-03T11:05:53+5:30
मॉडेलिंग, ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आणि जाहिरातींच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावतात.तरीही मुंबईत हक्काचं घर नाही. आजही विरूष्का भाड्याच्या घरात राहतात.
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांकडे स्वतःचे घर नसून भाड्याच्या घरात राहत असल्याची अनेक उदाहरणं आहेत. नुकतचे रणवीर सिंगने तीन वर्षांसाठी फ्लॅट भाड्याने घेतला आहे. रणवीर दीपिका हे लग्नानंतरही वेगवेगळे राहतात. विशेष म्हणजे रणवीरने दीपिकाच्याच बिल्डींगमध्ये हा फ्लॅट घेतला आहे. या घरासाठी पहिल्या दोन वर्षांसाठी रणवीर तब्बल ७ लाख २५ हजार रुपये प्रति महिना भाडं देणार आहे. त्यानंतर तीसऱ्या वर्षासाठी भाड्याची किंमत वाढून ७ लाख ९७ हजार रुपये प्रति महिना भाडं तो देणार आहे.
भरभक्कम पैसे कमवूनही भाड्याच्या घरात राहणारा रणवीर हा एकटा नसून टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचाही या यादीत समावेश आहे. यांच्या लग्नाला आता दोन वर्षे झाली आहेत.दोघेही मॉडेलिंग, ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आणि जाहिरातींच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावतात. तरीही मुंबईत हक्काचं घर नाही. आजही विरूष्का भाड्याच्या घरात राहतात.
लग्नानंतर हे दोघंही ३४ कोटींमध्ये खरेदी केलेल्या स्वप्नवत आलिशान घरात राहायला जाणार अशा चर्चा होत्या. मात्र तसं झालं नसून विराट आणि अनुष्का मुंबईत एका भाड्याने घेतलेल्या घरात राहत आहेत. या घराचं महिन्याचे भाडे जवळपास १५ लाख रुपये असल्याचं बोललं जत आहे. वरळीमधील रहेजा लिजेंड या गगनचुंबी इमारतीच्या ४०व्या मजल्यावर हा फ्लॅट असून तो जवळपास २७०० चौ. फूट इतका आहे.
२०१६ साली विराटने मुंबईतील ओमकार अपार्टमेंटमध्ये फ्लॅट खरेदी केला. ७००० चौ. फूट या फ्लॅटची किंमत ३४ कोटी इतकी आहे. मात्र विराट अनुष्काचे हे घर अद्याप तयार झाले नसून त्याला आणखीन काही वर्षाचा कालावधी लागणार आहे.