'नोटबुक' चित्रपटाचा सेट बनवला चक्क तलावात, फोटो पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 06:00 AM2019-03-11T06:00:00+5:302019-03-11T06:00:00+5:30

जहीर इकबाल व प्रनूतन यांचा 'नोटबुक' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'Notebook' set up a set of pics in the lake | 'नोटबुक' चित्रपटाचा सेट बनवला चक्क तलावात, फोटो पाहून व्हाल थक्क

'नोटबुक' चित्रपटाचा सेट बनवला चक्क तलावात, फोटो पाहून व्हाल थक्क

googlenewsNext
ठळक मुद्देसेटचे डिझाईन केले दोन तरूणींनी नोटबुक चित्रपट २९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला

जहीर इकबाल व प्रनूतन यांचा 'नोटबुक' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जहीर व प्रनुतन दोघे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कक्कड करत आहेत. या चित्रपटाची विशेष बाब म्हणजे या चित्रपटाचा सेट चक्क तलावाच्या मध्यभागी बनवण्यात आला आहे. 

'नोटबुक' चित्रपटात २००७ सालातील कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात तलवाच्या मध्यभागी असलेल्या एका शाळेवर या चित्रपटाची कथा बेतलेली आहे. त्यामुळे निर्मात्यांनी या चित्रपटाचा सेट पाण्यात बनवला आहे.

हा सेट बनवायला तीस दिवस लागले आणि त्यासाठी ८० लोकांनी चोवीस तास काम करून हा सेट बनविला आहे. या सेटचे डिझाईन दोन तरूणींनी केले असून उर्वी अशर व शिप्रा रावल असे त्यांची नावे आहेत. 


या सेटबद्दल नितीन कक्कडने सांगितले की,'मी वास्तविक ठिकाणी बनवलेल्या सेटवर पहिल्यांदा चित्रीकरण केले आहे. कला दिग्दर्शक उर्वी व शिप्रा यांनी उत्तम काम केले आहे. मला वाटले नव्हते की इतका चांगला सेट बनू शकतो. अशाप्रकारचा सेट बनवणे खूप कठीण होते. मात्र तीस दिवसात आमचे घर बनले. ज्या दिवशी चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आणि सेट काढायचा होता. त्यावेळी मला खूप वाईट वाटले. या सेटसोबत खूप आठवणी आहेत. ज्या मी कधीच विसरू शकत नाही.'


नोटबुक चित्रपट २९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: 'Notebook' set up a set of pics in the lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.