सिनेमाने जिवंत केले नॉवेलचे कॅरेक्टर
By Admin | Published: July 24, 2015 02:43 AM2015-07-24T02:43:47+5:302015-07-24T02:43:47+5:30
बॉलीवूडमध्ये एक काळ असाही होता जेव्हा साहित्य व सिनेमा हातात हात घालून चालायचे. ‘मुगल-ए-आझम’, ‘गाइड’, ‘साहेब बिवी और गुलाम’
सिनेमाने जिवंत केले नॉवेलचे कॅरेक्टर
बॉलीवूडमध्ये एक काळ असाही होता जेव्हा साहित्य व सिनेमा हातात हात घालून चालायचे. ‘मुगल-ए-आझम’, ‘गाइड’, ‘साहेब बिवी और गुलाम’, ‘देवदास’ ही त्याची यशस्वी उदाहरणे. गाजलेल्या कादंबरीचा नायक पडद्यावर पाहण्यासाठी तिकीट बारीवर तोबा गर्दी उसळायची. सिनेमाने नॉवेलचे अनेक कॅरेक्टर पडद्यावर साकारले. परंतु पुढे काळ बदलला आणि सिनेमाची व्याख्याही. तिकडे हॉलीवूडमध्ये असे प्रयत्न सातत्याने होत असताना बॉलीवूडमध्ये मात्र चित्रपटांनी कादंबरीची साथ जवळजवळ सोडली आहे.
तुलना तर होणारच
‘पीएस आय लव्ह यू’ ही प्रेमकथा शंभर वेळा वाचल्यावर याच कादंबरीवर आधारलेला सिनेमा पाहताना दोघांची तुलना होणे स्वाभाविकच आहे. हिलेरी स्वाँक किंवा गेराल्ड बटलर याच्या अभिनयाने फुललेला ‘पीएस आय लव्ह यू’ चांगला सिनेमा असला तरीदेखील वाचकांच्या मनात असणारी पात्रांची प्रतिमा विशेष प्रभाव टाकत नाही. दोघांतील फरक वाचक-प्रेक्षकांना थोडा विचलित करू शकतो. कथा किंवा कादंबरीचे रूपांतर सिनेमात करताना त्याचा मूळ गाभा कायम राखणे हे कठीण कार्य आहे.
तरीदेखील हॉलीवूडमध्ये असे प्रयत्न सातत्याने होत आहेत. मात्र बॉलीवूडमध्ये असे प्रयोग जवळजवळ थांबले आहेत. सिनेमातून एखाद्या कथानकाला मोठ्या पडद्यावर योग्य न्याय मिळत नाही अशी ओरड सातत्याने केली जाते. वाचकांच्या दृष्टीने चित्रपटातून दाखविलेला कल्पनाविस्तार अपेक्षेप्रमाणे नसतो. चित्रपटात कथेला रूपांतरित करताना त्यातील मोठा भाग काढून टाकला जातो. कथेला दोन-तीन तासांत दाखविण्यासाठी असे करावे लागत असल्याचे मान्य केल्यावरही बरेच काही मागे राहून जाते.
पूर्व व पश्चिमचे मिलन
बॉलीवूडमधील चित्र हॉलीवूडप्रमाणे नसल्याचे दिसते. येथे कादंबरीवर आधारित अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर आपली विशेष प्रतिमा कोरू शकले नाहीत. बॉलीवूडमधील महानतम चित्रपट असलेले ‘मुगल-ए-आझम’, ‘गाइड’, ‘साहेब बिवी और गुलाम’, ‘देवदास’ आदी चित्रपट आर.के. नारायणन, शरतचंद्र चटोपाध्याय, बिमल मित्रा यासारख्या महान लेखकांच्या त्या कादंबऱ्यांचे योग्य चित्रीकरण होते. मात्र याची माहिती केवळ काहीच प्रेक्षकांना व वाचकांना आहे.