आता रुपेरी पडद्यावर कबड्डी
By Admin | Published: April 10, 2016 01:38 AM2016-04-10T01:38:33+5:302016-04-10T01:38:33+5:30
इकबाल, चक दे इंडिया यांसारख्या खेळाशी संबंधित असलेल्या बॉलीवूड चित्रपटांना नेहमीच प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. असाच एक आपल्या मातीतील रांगडा खेळ असणारा कबड्डी
इकबाल, चक दे इंडिया यांसारख्या खेळाशी संबंधित असलेल्या बॉलीवूड चित्रपटांना नेहमीच प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. असाच एक आपल्या मातीतील रांगडा खेळ असणारा कबड्डी या खेळाशी संबंधित असलेला सूर-सपाटा हा मराठी चित्रपट प्रेक्षकांना वर्षाच्या अखेरीस पाहायला मिळणार आहे. मंगेश कंठाळे दिग्दर्शित सूर-सपाटा हा मराठी चित्रपट कबड्डी या आपल्या मातीतल्या खेळाची ओढ वाढविणारा आहे. नुकतेच या चित्रपटाचा मुहूर्तदेखील संपन्न झाला. या चित्रपटाचे कथानक कबड्डी खेळावर अपार प्रेम असलेल्या लहान मुलांवर आधारित आहे. तसेच या चित्रपटामध्ये महत्त्वाकांक्षी मुले व ज्येष्ठ कलाकार मोठ्या पडद्यावर दिसतील. जयंत लाडे प्रस्तुत सूर-सपाटा हा कबड्डी खेळावर लक्ष केंद्रित करणारा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल याच शंकाच नाही.