आता आजोबाच्या भूमिकेत!

By Admin | Published: June 23, 2016 03:13 AM2016-06-23T03:13:40+5:302016-06-23T03:13:40+5:30

‘स्वामी’ या गाजलेल्या मालिकेतील श्रीमंत महादेवराव पेशवे आठवताहेत? ‘शांती’मधील सिद्धार्थ सिंघानिया किंवा ‘झाले मोकळे आकाश’मधील श्रीरंग देशमुख आठवताहेत?

Now playing the grandfather! | आता आजोबाच्या भूमिकेत!

आता आजोबाच्या भूमिकेत!

googlenewsNext

‘स्वामी’ या गाजलेल्या मालिकेतील श्रीमंत महादेवराव पेशवे आठवताहेत? ‘शांती’मधील सिद्धार्थ सिंघानिया किंवा ‘झाले मोकळे आकाश’मधील श्रीरंग देशमुख आठवताहेत? नक्कीच आठवत असणार कारण, या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत. ज्येष्ठ अभिनेते रवींद्र मंकणी यांनी या भूमिका पडद्यावर अशा काही जिवंत केल्या की त्याच्या आठवणी प्रेक्षकांनी विसरणे शक्यच नाही. हेच रवींद्र मंकणी पुन्हा एकदा रिश्तों का सौदागर: बाझीगर या हिंदी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या निमित्ताने त्यांनी सीएनएक्सशी खास गप्पा मारल्या. त्यांच्याशी मारलेल्या गप्पांचा हा वृत्तांत खास आमच्या वाचकांसाठी...

प्रश्न : रिश्तों का सौदागर-बाजीगर या मालिकेत आपली नेमकी भूमिका काय?
4या मालिकेत मी आजोबाची भूमिका साकारली आहे. नातीवर अतिशय प्रेम करणारा आजोबा. तिच्या आयुष्यात सगळे काही चांगले होवो, अशी परमेश्वराकडे प्रार्थना करणारा आजोबा मी साकारला आहे. भूमिका परिपक्व होती. मला ती आवडली आणि मी तिच्यासाठी होकार दिला.
प्रश्न : या भूमिकेसाठी काही विशेष तयारी केलीत?
4नाही, तशी काही खास तयारी केलेली नाहीच. कारण डेली
सोपसाठी चित्रीकरण म्हणजे तासभर आधी स्क्रिप्ट हाती येते. त्यामुळे तयारी करायला तसाही फारसा वाव नसतोच. केवळ दिग्दर्शक आणि क्रिएटीव्ह हेडशी व्यक्तिरेखेबद्दल चर्चा केली तेवढंच. कारण त्यांच्या डोक्यात व्यक्तिरेखेचं चित्र अगदी पक्क होतं. मी ते माझ्या अभिनयातून रंगवतोयं, एवढचं.
प्रश्न : आपण अजून आजोबा झालेला नाहीत. पण पडद्यावर आजोबा झालात. हा अनुभव कसा राहिला?
4होय, अद्याप मी आजोबा झालेलो नाही. पण भूमिका माझ्या
वयाला अनुसरून होती आणि मला ती मनापासून आवडली. पडद्यावर ती जगतानाचा अनुभव चांगलाच राहिला. शोमधील कलाकारांशी माझी चांगली गट्टी जमलीयं. वेळ मिळेल तेव्हा आमच्यात मस्तपैकी गप्पांचा फड रंगतो.
प्रश्न : या मालिकेव्यतिरिक्त आणखी कुठल्या प्रोजेक्टवर आपण काम करीत आहात?
4सध्या तरी या मालिकेवर मी माझे लक्ष केंद्रीत केले आहे.
याव्यतिरिक्त कुठलाही प्रोजेक्ट माझ्या हातात नाही. शूटिंग असले की मुंबई. ऐरवी मी पुण्यात असतो. वेळ मिळाला की मी पुणे गाठतो.
प्रश्न : पुण्यावर इतके प्रेम, यामागे काही खास कारण?
4खास असे कारण नाही. पण माझा जन्म पुण्यातला. मी येथेच
लहानाचा मोठा झालो. माझे इंजिनीअरिंगचे शिक्षणही पुण्यातच झाले आहे. जुने पुणे आणि आत्ताचे बदलते पुणे, हे स्थित्यंतर मी पाहिले, अनुभवले आहे. पुण्याच्या संस्कृतीवर माझे मनापासून प्रेम आहे. वेळ मिळेल तेव्हा मी पुण्याला धाव घेतो, कारण पुणे हे माझे पहिले घर आहे. माझे आॅफिसही येथे आहे.
प्रश्न : मराठी वा हिंदी सिनेमा यापैकी आपण कशाची निवड कराल?
4या प्रश्नाचे उत्तर तसे कठीण आहे. मला दोन्ही सिनेमांत काम करायला आवडेल. मराठी ही माझी मातृभाषा तर हिंदी ही माझी व्यावसायिक भाषा. पण खरं सांगू,मराठी नाटक करायला मला अधिक आवडतं.
प्रश्न : मराठी चित्रपटसृष्टी सध्या बहरते आहे, आपल्याला काय वाटते?
4निश्चित, मराठी चित्रपटसृष्टी अतिशय उत्तम काम करीत आहे.
वेगळ्या विषयाचे, वेगळ्या धाटणीचे चित्रपट येत आहेत. नवे विषय, नवे कलाकार, नवे तंत्र असले तरी त्यातील परिपक्तवता जाणवणारी आहे. मला याचा मनस्वी आनंद आहे.
प्रश्न : प्रेक्षकांनी आपल्यावर भरभरून प्रेम केले. आपल्या चाहत्यांना काय सांगू इच्छिता?
4मी सर्वोत्तम काम करावे, हीच माझ्या चाहत्यांची इच्छा
आहे आणि त्यांच्या इच्छेचा मान राखणे हे माझे कर्तव्य आहे. मी माझे कर्तव्य प्रामाणिकपणे निभवेल. माझी नवी मालिका आणि त्यातील माझी भूमिका प्रेक्षकांना आवडेल, अशी आशा करतो. प्रेक्षकांचे प्रेम असेच मिळत राहो,अशी कामना करतो.

Web Title: Now playing the grandfather!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.