...आता मुक्काम पोस्ट ‘बॉलिवूड’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2016 02:12 PM2016-11-02T14:12:53+5:302016-11-02T14:12:53+5:30
बॉलिवूड आणि परदेशी नायिका हे समीकरण नवीन नाही. ‘शिवाय’ या चित्रपटातून पोलिश अभिनेत्री एरिका कार ही पदार्पण करीत आहे. ...
ब लिवूड आणि परदेशी नायिका हे समीकरण नवीन नाही. ‘शिवाय’ या चित्रपटातून पोलिश अभिनेत्री एरिका कार ही पदार्पण करीत आहे. तिच्या मते बॉलिवूड चित्रपटांमध्ये जणू काही मॅजिक आहे. माझ्या देशातील चित्रपट हे हिंसात्मक विषयावर आधारित असतात. बॉलिवूडपटातील म्युझिक मला अधिक भावते. मी अजय देवगनप्रमाणे आमिर, सलमान, ऐश्वर्या, काजोल यांची जबरदस्त फॅन आहे. भविष्यात जर मला चांगल्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली, तर मी बॉलिवूडमध्येच करिअर करेन, अशी इच्छा एरिकाने व्यक्त केली. यावेळी तिने ‘सीएनएक्स’शी बोलताना बॉलिवूडशी संबंधित अनेक किस्से सांगितले. तिच्याशी मारलेल्या गप्पा...
प्रश्न : बॉलिवूडविषयीचे तुझे आकर्षण कसे वाढले?
- मी पूर्वीपासूनच बॉलिवूड चित्रपटांची डाय हार्ड फॅन आहे. शाहरूख-काजोल या जोडीला पोलंडमध्ये खूप पसंत केले जाते. माझ्या मते, शाहरूख खान इंटरनॅशनल स्टार आहे. आमच्याकडे त्याचे सिनेमे पोलिश भाषेत प्रदर्शित केले जात असल्याने मी त्याची जबरदस्त फॅन आहे. त्याव्यतिरिक्त मला आमिर खान याचा ‘थ्री इडियट’ हा चित्रपट खूप आवडतो. ‘बाजीराव मस्तानी’ हा तर माझा फेव्हरेट आहे. ‘पिंगा ग पोरी पिंगा’ हे गीत नेहमीच ऐकावसे वाटते. तसेच देवदास हा चित्रपट देखील मला खूप आवडतो. मी अजय देवगन याच्याबाबतीत फारसे जाणून नव्हते. ‘शिवाय’मध्ये काम करताना मला अजय देवगनमधील एक स्टार आणि दिग्दर्शक या दोहोंचे खरे रूप दिसले. तो एक जबरदस्त अभिनेता आहे.
प्रश्न : अजय देवगन याच्यासोबत काम करण्याचा तुझा अनुभव कसा सांगशील?
- अजय हा खूप हार्ड वर्क करणारा व्यक्ती असल्याने त्याचा मी आदर करते. हा माझा पहिलाच हिंदी चित्रपट असल्याने सुरुवातीला मी प्रचंड दडपणात होती. स्क्रीप्ट रीडिंग करताना अजयने मला बरीच मदत केली. एखादा सीन बदलल्यास ते समजावून सांगण्यास अजय मला मदत करीत असे. त्यामुळेच मी या चित्रपटातून बरेच काही शिकले. हा जरी माझा पहिलाच चित्रपट असला तरी, तो मी आत्मविश्वासाने पूर्ण केला. अर्थात अजयच्या मदतीशिवाय हे शक्य नसते.
प्रश्न : हिंदीतील डायलॉग बोलताना तुला काय अडचणी आल्या?
- चित्रपटात माझ्या आवाजासाठी डबिंगचा वापर केला गेला. मी हिंदी भाषा शिकण्यासाठी आजही प्रयत्न करीत आहे. चित्रपटादरम्यान मी हिंदीची शिकविणी लावली होत. सुरुवातीला डायलॉग बोलताना अडचणी येत होत्या. नंतरच्या काळात हिंदी बोलणे जमायला लागले. मी अर्थशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण घेत असून, हिंदी आता माझ्या आवडीचा विषय बनला आहे. भविष्यात मला चांगल्या चित्रपटांच्या आॅफर्स आल्यास मला नक्कीच हिंदी शिकावे लागेल.
प्रश्न : काजोलला तू भेटलीस?
- नाही, मला अद्यापपर्यंत काजोलला भेटण्याची संधी मिळाली नाही. मी काजोलविषयी जाणून आहे. ती एक मोठी स्टार आहे. शाहरूख-काजोलची जोडी मला खूप आवडते. जेव्हा आमच्या देशात शाहरूख-काजोलचे चित्रपट प्रदर्शित होत असत तेव्हा मी ते आवडीने पाहायची. त्यामुळे मी काजोलचीही फॅन आहे. तिला भेटायला मला नक्कीच आवडेल.
प्रश्न : चित्रपटाच्या यशाबाबत तुझे काय मत आहे?
आतापर्यंत चित्रपटाचे दोन ट्रेलर रिलिज झाले असून, प्रेक्षकांचा त्यास चांगला रिस्पॉन्स मिळालाय. चित्रपटाबाबत प्रेक्षक पॉझिटिव्ह असल्याने मी समाधानी आहे. त्याचबरोबर भारतीय लोकांकडून मला मिळत असलेले प्रेमही भारावून टाकणारे आहे. लोकांचा हा सपोर्ट माझा आत्मविश्वास उंचावणारा असून, माझ्यात सुरक्षिततेची भावना निर्माण करीत आहे. चित्रपट नक्कीच प्रेक्षकांना भावेल असा मला विश्वास आहे.