नग्नता म्हणजे बीभत्सपणा नाही!

By Admin | Published: September 11, 2016 02:56 AM2016-09-11T02:56:27+5:302016-09-11T02:56:27+5:30

राज रिबूट चित्रपटातील क्रिती खरबंदाच्या न्यूड सीनची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र दिग्दर्शक विक्रम भट्टचे म्हणणे आहे की, हा सीन चित्रपटाच्या कथेला साजेसा आणि अत्यंत महत्त्वाचा आहे

Nudity is not greed! | नग्नता म्हणजे बीभत्सपणा नाही!

नग्नता म्हणजे बीभत्सपणा नाही!

googlenewsNext

राज रिबूट चित्रपटातील क्रिती खरबंदाच्या न्यूड सीनची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र दिग्दर्शक विक्रम भट्टचे म्हणणे आहे की, हा सीन चित्रपटाच्या कथेला साजेसा आणि अत्यंत महत्त्वाचा आहे. तो सांगतो, ‘माझ्या चित्रपटातील नग्नता बीभत्सपणा किंवा सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी नसते. या चित्रपटातसुद्धा क्रितीचे पात्राला जेव्हा दुष्ट आत्मा पछाडतो तेव्हा सगळ्या सामाजिक चौकटी मोडून देहभान विसरून ते नग्न होते. एका प्रकारे कथेची ती गरज होती. त्यामुळे या सीनकडे मी कलात्मकदृष्टीने पाहतो. सिनेमा पाहताना प्रेक्षकांनाही ते जाणवेल की, त्यामध्ये कामुकता कु ठेही नाही.’ राज सिरीजमधील हा चौथा चित्रपट असून यापूर्वी पहिल्या ‘राज’ चित्रपटात मालिनी शर्मा तर ‘राज ३’मध्ये इशा गुप्ता यांनी न्यूड सीन केलेला आहे.

Web Title: Nudity is not greed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.