Nysa Devgn : पैसा सब बदल देता है भाई..., अजय-काजोलची लेक न्यासाचा बदललेला लुक पाहून नेटकऱ्यांच्या कमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 10:20 AM2022-10-25T10:20:15+5:302022-10-25T10:20:25+5:30

Nysa Devgn Video : सध्या न्यासाचीच चर्चा रंगलीये. होय, न्यासा एका दिवाळी पार्टी दिसली आणि तिला पाहून प्रत्येकजण हैराण झाला...

nysa devgan kajol ajay daughter looked very changed in diwali party | Nysa Devgn : पैसा सब बदल देता है भाई..., अजय-काजोलची लेक न्यासाचा बदललेला लुक पाहून नेटकऱ्यांच्या कमेंट्स

Nysa Devgn : पैसा सब बदल देता है भाई..., अजय-काजोलची लेक न्यासाचा बदललेला लुक पाहून नेटकऱ्यांच्या कमेंट्स

googlenewsNext

बी-टाऊन असो किंवा मग सोशल मीडिया प्रत्येक ठिकाणी स्टार किड्सची जोरदार चर्चा ऐकायला मिळते. आपल्या पालकांपेक्षा ‘हम भी कुछ कम नहीं’ असं दाखवून देणारे अनेक स्टार किड्स सध्या चर्चेत आहेत. जान्हवी कपूर, सुहाना खान, अनन्या पांडे असे बड्या बड्या स्टार कलाकारांची मुलं सध्या जोरदार चर्चेत आहेत. या स्टार किड्सचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत असतात.  याच यादीत आता आणखी नव्या नावाची भर पडली आहे. हे नाव म्हणजे न्यासा देवगण. न्यासाची वेगळी ओळखची तशीही गरज नाही. 
काजोल (Kajol)  व अजय देवगणची  (Ajay Devgn) लाडकी लेक न्यासा देवगण (Nysa Devgn)  भलेही चित्रपटांपासून दूर आहे. पण चर्चेत राहणे तिलाही जमते. सध्या न्यासा जाम चर्चेत आहे. अजय देवगणकाजोलची  लेक न्यासा देवगण लाईमलाइटपासून दूर राहण्याचा प्रयत्न करते. पण सुपरस्टार्सची लेक म्हटल्यावर चर्चा तर होणारच. न्यासा ग्लॅमरस लुकमुळे चर्चेत असते.  सध्या न्यासाचीच चर्चा रंगलीये. होय, गेल्या रविवारी न्यासा एका दिवाळी पार्टी दिसली आणि तिला पाहून प्रत्येकजण हैराण झाला.

 तिला ओळखणंही अनेकांसाठी कठीण झालं होतं. दिवाळी पार्टीमध्ये न्यासा देवगण आकाशी रंगाच्या प्रींटेड लेहंग्यामध्ये दिसली. आपल्या एका मित्रासोबत ती पार्टीत पोहोचली. न्यासाने पापाराझींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. कारमध्ये ती आपल्या मित्रांसोबत गप्पा मारताना दिसली. न्यासाचा या दिवाळी पार्टीतील व्हिडीओ पाहून अनेकांनी न्यासाला ओळखलं नाही. ती बरीच बदललेली दिसली. तिचा हा लुक पाहून अनेकजण हैराण झालेत. मग काय, अनेक युजर्सनी कमेंट्स करत न्यासाने सर्जरी करण्याचा अंदाज बांधला.
न्यासाने चेहऱ्याची सर्जरी केल्याचं अनेकांनी म्हटलं तर  काहींनी न्यासाने नाकावर सर्जरी केल्याचा दावा केला. अनेकांनी  न्यासा जान्हवीसारखी का दिसतेय, तिने प्लास्टिक सर्जरी केली आहे का? असा सवाल  केला.

याआधी न्यासा देवगण भूमी पेडणेकरच्या पार्टीत पोहोचली होती, तेव्हा तिच्या जबरदस्त स्टाइलचं खूप कौतुक झालं होतं. न्यासा अनेकदा सोशल मीडियावर तिच्या फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असते. ती कधी मित्रांसोबत पार्टी करताना तर कधी फिरायला गेल्यावर इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत असते.

Web Title: nysa devgan kajol ajay daughter looked very changed in diwali party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.