मदर्स डेच्या निमित्ताने छोट्या पडद्यावरील कलाकारांनी सांगितले आईचे महत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 08:00 AM2021-05-09T08:00:00+5:302021-05-09T08:00:00+5:30

मदर्स डेच्या निमित्ताने हिंदी मालिकेतल्या कलाकारांनी आपल्या आईच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

On the occasion of Mother's Day, small screen actors spoke about the importance of motherhood | मदर्स डेच्या निमित्ताने छोट्या पडद्यावरील कलाकारांनी सांगितले आईचे महत्त्व

मदर्स डेच्या निमित्ताने छोट्या पडद्यावरील कलाकारांनी सांगितले आईचे महत्त्व

googlenewsNext

मदर्स डेच्या निमित्ताने हिंदी मालिकेतल्या कलाकारांनी आपल्या आईच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच यंदाचा मदर्स डे कसा साजरा करणार आहेत, याबद्दलही सांगितले आहे.

'जीजाजी छत पर कोई है'मधील सुभाशिष झा ऊर्फ जीजाजी: 


''माझी आई अत्‍यंत प्रबळ इच्‍छाशक्‍ती असलेली व्‍यक्‍ती आहे. मी माझ्यामध्‍ये तिची शिस्‍तबद्धता व आत्‍मविश्‍वास आत्‍मसा‍त केले आहे. दरवर्षी मातृ दिनी मी तिला फुले, केक किंवा तिच्‍या चेह-यावर आनंद आणणारी आणि तिला बरे वाटेल अशी कोणतीही भेटवस्‍तू पाठवतो. तिने नेहमीच मला मार्गदर्शन केले आहे. तिच्‍याकडून मला मिळालेला सर्वोत्तम सल्‍ला म्‍हणजे कितीही प्रसिद्धी मिळाली तरी आपले पाय जमिनीवरच असले पाहिजेत आणि जीवनात कोणतेही बदल होवोत, आपण संयमी राहिले पाहिजे. मी याच शिकवणीचे अनुसरण करतो. तिच्‍यासोबतची माझी सर्वात संस्‍मरणीय आठवण म्‍हणजे मी रविवारी सकाळच्‍या वेळी तिच्‍यासोबत एका स्‍टेशनरी दुकानामध्‍ये जायचो आणि त्‍या ट्रिप्‍स खूपच रोमांचक व धमाल होत्‍या. कारण माझी आई माझ्यासाठी स्‍टेशनरी वस्‍तू, काही खेळणी व गूडीज खरेदी करायची. ती क्‍वचितच एखाद्या गोष्‍टीसाठी विचारते. म्‍हणूनच तिच्‍यासोबत गप्‍पागोष्‍टी करताना तिला आवडणा-या गोष्‍टींची मी नोंद करतो. मी तिच्‍यासाठी एखादे विशिष्‍ट गॅजेट आणले, तर तिला त्‍याचा वापर कसा करावा याबाबत मदत करतो. तंत्रज्ञानप्रेमी नसल्‍यामुळे ती अनेकदा त्‍या गोष्‍टी शिकण्‍यामध्‍ये संकोचते आणि मला ते खूपच क्युट वाटते. यंदा आपल्‍याला अनोख्‍या पद्धतीने मातृ दिन साजरा करावा लागणार आहे. मी तिच्‍यासाठी स्‍पेशल मॉण्‍टेज व्हिडिओ बनवत आहे.''  

'तेरा यार हूं मैं'मधील सयंतनी घोष ऊर्फ दलजीत बग्‍गा:


''माझ्या बालपणापासून माझ्या आईने मला नेहमीच स्‍वावलंबपणाच्‍या महत्त्वाची शिकवण दिली आहे. ज्‍यामुळे आज मी स्‍वावलंबी व खंबीर महिला बनू शकले आहे. माझा वाढदिवसाशिवाय एकाच दिवशी खास क्षण साजरा करण्‍यावर विश्‍वास नाही. माझा लहान-लहान गोष्‍टी करत वर्षभर लोकांना खास भावना द्यायला आणि त्‍यांच्‍या संपर्कात राहायला आवडते. मी मोठी होत असताना माझी आईच माझी पहिली जिवलग मैत्रिण होती आणि आजही ती माझी ल्‍युडो खेळामधील पार्टनर आहे. ती अत्‍यंत क्षमाशील आहे आणि नेहमीच कोणत्‍याही गोष्‍टीच्‍या सकारात्‍मक बाजूकडे पाहते. माझ्यामध्‍ये असलेल्‍या दयाळू वृत्तीचे श्रेय तिला जाते. सामान्‍यत: मी तिला पुष्‍पगुच्‍छ पाठवते किंवा तिला खास वाटावे म्‍हणून तिच्‍यासाठी कूकिंग करते. यंदा आम्‍ही एकमेकींना भेटू शकणार नाही. म्‍हणून मी तिच्‍यासाठी एक केक व फुले पाठवणार आहे आणि तिचे प्रेम व तिच्‍या चांगल्‍या आरोग्‍यासाठी शुभेच्‍छा देणार आहे.''  

'मॅडम सर'मधील युक्‍ती कपूर ऊर्फ करिष्‍मा सिंग: 


''माझ्या मते, प्रत्‍येक मूल आपल्‍या आईच्‍या खूप जवळ असते, विशेषत: मुली! माझी आई ब्‍युटिशियन आहे आणि मी तिच्‍याकडून भरपूर काही शिकले आहे. मला तिच्‍याकडून मिळालेला सर्वोत्तम सल्‍ला म्‍हणजे आपण जगामध्‍ये अल्‍पकाळासाठीच असतो आणि जीवन आनंदाने की दु:खासह जगावे हे स्‍वत:हून ठरवावे. ती नेहमीच सर्वांना लगेचच माफ करते आणि मी तिच्‍याकडून हा गुण आत्‍मसात केला आहे. बालपणापासून मी तिला कुटुंबासाठी काम करताना, अथक मेहनत घेताना पाहत आले आहे आणि ते देखील चेह-यावर आनंद ठेवून. मी तिच्‍याकडून शिकले आहे की स्थिती कशीही असो आपण नीडरपणे, सक्षमपणे आणि आनंदाने जीवन जगले पाहिजे. ती माझी जिवलग मैत्रिण आहे. तिने नेहमीच मला प्रत्‍येक क्षण आनंदाने जगण्‍याचा आणि मला आनंदित करणा-या गोष्‍टी करण्‍याचा सल्‍ला दिला आहे. बालपणाबाबतची सर्वात संस्‍मरणीय आठवण म्‍हणजे माझी नेहमीच मुलीसारखा पेहराव करण्‍याची इच्‍छा असताना देखील तिने मला मुलासारखे कपडे घातले होते आणि माझे केस देखील बारीक केले होते. सामान्‍यत: मी तिच्‍यासाठी चांगले जेवण बनवण्‍याची खात्री घेते. तिला सोन्‍याचे दागिने खूप आवडतात. म्‍हणून तिला दागिन्‍यासोबत केक व फुले पाठवत राहते. तिला घराची सजावट करायला देखील आवडते. म्‍हणून इंटीरिअर्सच्‍या बाबतीत मी तिला आवडणारी वस्‍तू देणार आहे.'' 

'काटेलाल अॅण्‍ड सन्‍स'मधील मेघा चक्रवर्ती ऊर्फ गरिमा:


''कुटुंबाची मूल्‍ये व महत्त्व समजावण्‍यापासून माझ्यामध्‍ये ती शिकवण बिंबवण्‍यापर्यंत माझ्या आईने मला सर्व गोष्‍टी शिकवल्‍या आहेत. माझ्या मते, आपण प्रत्‍येक दिवशी मातृ दिन साजरा करावा आणि दररोज तिला खास वाटेल असे काहीतरी करावे. माझ्या आईने मला नेहमीच मोठ्यांचा आदर करण्‍याचा आणि कामाप्रती प्रामाणिक राहण्‍याचा सल्‍ला दिला आहे. तिने माझ्यामध्‍ये आसपास घडणा-या, विशेषत: प्राण्‍यांच्‍या बाबतीत घडणा-या अन्‍यायाविरोधात उभे राहण्‍याची विचारसरणी बिंबवली आहे. तिने अनेक त्‍याग केले आहेत आणि मी त्‍यासाठी तिचे जितके आभार मानेन ते कमीच आहे. माझी संस्‍मरणीय आठवण हिवाळ्यासंबंधित आहे, जेथे ती मला उठवताना तिचे उबदार स्लिपर्स द्यायची, ज्‍यामुळे मला थंडगार जमिनीवर पाय ठेवावे लागायचे नाही. मी तिच्‍यासाठी नुकतेच किचन व घराचे नूतनीकरण केले आणि तिला खूप आनंद झाला. माझी आई कोलकात्यामध्‍ये एक लहान एनजीओ चालवते आणि भटक्‍या प्राण्‍यांची आत्‍मीयतेने व सक्रियपणे काळजी घेते.''           
 

Web Title: On the occasion of Mother's Day, small screen actors spoke about the importance of motherhood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.