'नोटबुक'च्या शूटिंगदरम्यानचा ऑफस्क्रीन व्हिडिओ होतोय व्हायरल, पहा हा Video
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 09:00 PM2019-03-11T21:00:00+5:302019-03-11T21:00:00+5:30
जहीर इकबाल व प्रनूतन बहल यांचा 'नोटबुक' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
जहीर इकबाल व प्रनूतन बहल यांचा 'नोटबुक' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जहीर व प्रनुतन दोघे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कक्कड करत आहेत. या चित्रपटाची विशेष बाब म्हणजे या चित्रपटाचा सेट चक्क तलावाच्या मध्यभागी बनवण्यात आला आहे. या चित्रपटात जहीर व प्रनूतन यांच्या व्यतिरिक्त बालकलाकार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळीच्या मजामस्तीचा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. जो सध्या व्हायरल होत आहे.
नोटबुक' चित्रपटात २००७ सालातील कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात तलवाच्या मध्यभागी असलेल्या एका शाळेवर या चित्रपटाची कथा बेतलेली आहे. त्यामुळे निर्मात्यांनी या चित्रपटाचा सेट पाण्यात बनवला आहे. हा सेट बनवायला तीस दिवस लागले आणि त्यासाठी ८० लोकांनी चोवीस तास काम करून हा सेट बनविला आहे. या सेटचे डिझाईन दोन तरूणींनी केले असून उर्वी अशर व शिप्रा रावल असे त्यांची नावे आहेत. नोटबुक चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जहीर इकबाल व प्रनूतन बहल यांची केमिस्ट्री खूप छान वाटते आहे. त्यात आता शूटिंगदरम्यानची ऑफस्क्रीन केमिस्ट्री देखील खूप छान वाटते आहे.
प्रनूतन ही अभिनेता मोहनीश बहलची मुलगी आहे तर एकापेक्षा एक सरस चित्रपट देणारी एकेकाळखी प्रख्यात अभिनेत्री नूतन यांची नात आहे. जहीरबद्दल सांगायचे तर तो सलमानच्या मित्राचा मुलगा आहे. एका पार्टीत सलमानने जहीरला पाहिले आणि त्याला चित्रपट ऑफर केला. कधीही एकमेकांना न भेटलेल्या पण प्रेमात पडलेल्या जोडप्याची कथा तुम्हाला चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटाचे अधिकाधिक चित्रीकरण हे काश्मीरमध्ये झाले आहे. येत्या २९ मार्चला ‘नोटबुक’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.