अरे देवा ! बजरंगी भाईजानच्या मुन्नीलाही नेटीझन्स करतायेत ट्रोल, हर्षाली दिसताच युजर्स म्हणाले........
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 12:39 PM2021-02-12T12:39:56+5:302021-02-12T12:43:28+5:30
बाल कलाकार म्हणून हा तिचा पहिला चित्रपट होता जो सुपरहिट ठरला. या सिनेमाने कमाईचे अनेक रेकॉर्डही मोडले. बजरंगी भाईजान चित्रपटातील मुन्नीच्या भूमिकेमुळे हर्षालीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली होती.
बॉलीवुडचा दबंग खान सलमानचा बजरंगी भाईजान हा सिनेमा सगळ्यांनीच पाहिला असेल. या सिनेमातील भाईजान सा-यांनाच भावला .हा सिनेमा भाईजान आणि मुन्नीवर आधारित होता. मुन्नी भूमिका साकारली होती हर्षाली मल्होत्राने. रूपेरी पड्यादवर तिच्या वाट्याला एकही डायलॉग नसला तरी तिचा रुपेरी पडद्यावरील अंदाज पाहून सा-यांनीच तिचे कौतुक केले होते. हा सिनेमा केला तेव्हा मुन्नी फक्त सात वर्षाची होती. आता ती १३ वर्षाची झाली आहे. क्युट दिसणारी मुन्नी आता मोठी होतेय त्याच बरोबर ती ग्लॅमरसही दिसू लागली आहे.
नुकतीच मुन्नीला विमानतळावर स्पॉट केले गेले.तेव्हा मीडियाच्या कॅमे-यांना मुन्नीनेही हसतमुखाने पोजवर पोज दिल्या. हे फोटो पाहून नेटीझन्सनी मात्र तिला ट्रोल करायला सुरुवात केली.मुन्नीच्या चेह-यावरील चमक पाहून नेटीझन्सने तिची खिल्ली उडवायला सुरुवात केली. एका युजरने म्हटले की, ही काय पॉन्डसचे पावडर लावून फिरते का? इतकी गोरी दिसतेय.
तर एका ने म्हटले की, चालता- फिरता पावडरची जाहीरात तर करत नाही ना? बॉलिवूड कलाकारांना ट्रोलिंगचा सामना करणे तसेही काही नवीन नाही, एरव्ही बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांना ट्रोल करणारे नेटीझन्सनी तर मुन्नीलाही ट्रोल करायला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे.
बाल कलाकार म्हणून हा तिचा पहिला चित्रपट होता जो सुपरहिट ठरला. या सिनेमाने कमाईचे अनेक रेकॉर्डही मोडले. बजरंगी भाईजान चित्रपटातील मुन्नीच्या भूमिकेमुळे हर्षालीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली होती. तिला या सिनेमासाठी स्क्रीन अवॉर्डचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला होता.
सिनेमात काम करण्यासाठी हर्षाली मल्होत्राने दोन-तीन लाख रुपये घेतले. त्यावेळी हर्षाली अवघ्या सात वर्षांची होती. सुरूवातीला ‘बजरंगी भाईजान’च्या शूटिंगदरम्यान हषार्ली सतत रडायची. सलमानचा फायटिंग सीन वा इमोशनल सीन पाहिला की ती रडू लागायची.
इतकेच नाही तर सलमान खानसोबत बोलताना ती प्रचंड लाजायची. पण हळूहळू दोघांतही चांगली मैत्री झाली होती. ‘बजरंगी भाईजान’ हा सिनेमा करण्याआधी हषार्लीने कुबूल है, लौट आओ तृषा आणि सावधान इंडिया अशा अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.