अंकुश चौधरीच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या मित्राने शेअर केला हा जुना फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 11:45 AM2018-01-31T11:45:26+5:302018-01-31T17:15:26+5:30
अंकुश चौधरीने गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीत त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. अंकुशने दुनियादारी, डबल सीट, ती सध्या ...
अ कुश चौधरीने गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीत त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. अंकुशने दुनियादारी, डबल सीट, ती सध्या काय करते यांसारखे अनेक हिट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. अंकुशच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक केले जाते. पण त्याचसोबत त्याच्या दिसण्यावर देखील त्याचे चाहते नेहमीच फिदा असतात. अंकुशचा आज वाढदिवस असून त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचे चाहते, त्याचे मित्रमैत्रीण त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. सोशल मीडियावर अनेकांनी अंकुशचे फोटो शेअर करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोंमधील एक फोटो सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. अंकुशच्या एका मित्राने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्याचा एक खूप जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्यासोबत विजय चव्हाण, क्रांती रेडकर, सुप्रिया पाठारे आणि केदार शिंदे दिसत आहेत. हा फोटो तू तू मी या नाटकाच्या वेळेचा आहे. या नाटकात अंकुश एका महत्त्वाच्या भूमिकेत होता. या फोटोत अंकुश खूपच वेगळा दिसत आहे.
१९८९-९० दरम्यान महाराष्ट्राची लोकधारापासून अंकुशने त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तो ऑल द बेस्ट या नाटकात झळकला. या नाटकातील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. सुना येती घरा या चित्रपटाद्वारे अंकुशने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याने हसा चकट फू, आभाळमाया, बेधुंद मनाच्या लहरी यांसारख्या मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
जत्रा, मातीच्या चुली, आई शप्पथ, यांचा काही नेम नाही, यंदा कर्तव्य आहे, माझा नवरा तुझी बायको, चेकमेट, उलाढाल, रिंगा रिंगा, लालबाग परळ, प्रतिबिंब असे अनेक सुपरहिट चित्रपट अंकुशने मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. अभिनयक्षेत्रात यश मिळाल्यानंतर तो दिग्दर्शनाकडे वळला. त्याने अगंबाई अरेच्चा आणि जत्रा या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. तसेच साडे माडे तीन चित्रपटाच्या माध्यमातून त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले. इतकेच नाही तर त्याने बॉलिवुडमध्येदेखील आपल्या अभिनयाची जादू निर्माण केली आहे. जिस देश में गंगा रहता है या हिंदी चित्रपटात देखील तो झळकला होता.
Also Read : “तुमच्यासाठी काय पन”च्या मंचावर अंकुशची हटके अंदाजात एंट्री!