बॉक्स ऑफिसवर फेल ठरलेला 'आदिपुरुष' ओटीटी पदार्पणासाठी सज्ज, कधी आणि कुठे पाहाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 04:50 PM2023-07-25T16:50:37+5:302023-07-25T16:51:19+5:30

ओम राऊतचा 'आदिपुरुष' या दिवशी ओटीटीवर होणार प्रदर्शित, कुठे आणि कसा पाहाल? जाणून घ्या

om raut adipurush movie to released on ott amazon prime prabhas kriti sanon | बॉक्स ऑफिसवर फेल ठरलेला 'आदिपुरुष' ओटीटी पदार्पणासाठी सज्ज, कधी आणि कुठे पाहाल?

बॉक्स ऑफिसवर फेल ठरलेला 'आदिपुरुष' ओटीटी पदार्पणासाठी सज्ज, कधी आणि कुठे पाहाल?

googlenewsNext

ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' सिनेमा १६ जूनला सर्वत्र प्रदर्शित झाला. टीझरपासूनच या चित्रपटबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. 'तान्हाजी', 'लोकमान्य एक युगपुरुष' या चित्रपटांचे दिग्दर्शन केलेल्या ओम राऊतच्या 'आदिपुरुष' सिनेमाकडून प्रेक्षकांना फार अपेक्षा होत्या. परंतु, हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षेस खरा न उतरल्यामुळे बॉक्स ऑफिसवर आपटला. रामायणावर आधारित असलेला हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक सुरुवातीला सिनेमागृहांत गर्दी करत होते. परंतु, नंतर प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत खेचून आणण्यात 'आदिपुरुष' अपयशी ठरला. 

६०० कोटींचं बजेट असलेला 'आदिपुरुष' चित्रपटातील संवाद, व्हिएफएक्स आणि पात्रांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्यानंतर चित्रपटातील संवाद बदलण्याचा निर्णय टीमकडून घेण्यात आला होता. बॉक्स ऑफिसवर फेल ठरलेला 'आदिपुरुष' त्याच्या ओटीटी पदार्पणासाठी सज्ज आहे. १ ऑगस्टला हा सिनेमा अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ओम राऊतचा 'आदिपुरुष' चित्रपट आता प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येणार आहे. 

राज ठाकरेंमुळे सोनाली बेंद्रेने दिला 'छम छम करता है' गाण्याला होकार, केदार शिंदेंचा खुलासा

"भगवद्गीतेचा अपमान करू नका", 'ओपेनहायमर'मधील 'त्या' सीनवर 'महाभारता'चे भीष्म संतापले

'आदिपुरुष' चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता प्रभास श्रीरामाच्या भूमिकेत आहे. तर बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन हिने सीता माताची भूमिका साकारली आहे. सैफ अली खान रावणाच्या तर सनी सिंग लक्ष्मणाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात देवदत्त नागे, तेजस्विनी पंडित, सोनाली खरे हे कलाकारही महत्त्वपर्ण भूमिका साकारताना दिसले. 

Web Title: om raut adipurush movie to released on ott amazon prime prabhas kriti sanon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.