"तो बबड्या कमी आणि डबड्याच जास्त दिसतोय",'अग्गंबाई सूनबाई' मालिकेचा नवीन प्रोमो पाहून चाहते उडवतायेत खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 11:14 AM2021-03-09T11:14:32+5:302021-03-09T11:24:33+5:30
Aggabai Soonbai New Promo Out मालिकेतील कलाकारांनाही रिप्लेस करण्यात आले असून नावातही बदल करण्यात आलाय. 'अग्गंबाई सासूबाई’ मालिकेचे दुसरे पर्व 'अग्गंबाई सूनबाई’ येत्या १५ मार्चपासून रसिकांच्या भेटीला येत आहे.
'अग्गंबाई सासूबाई’ मालिका सुरु झाली तेव्हा. अल्पावधीतच रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती. व्यक्तीरेखांपैकी एक मालिकेतील व्यक्तीरेखा सर्वात जास्त लक्षवेधी ठरली होती. ती म्हणजे आशूतोष पत्कीने साकारलेली सोहम अर्थात सा-यांचा बबड्या. बबड्याची भूमिका पाहून अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात जायची.
बबड्यावरुन भरपूर मिम्सही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण लवकरच ही मालिका आता नव्या ढंगात रसिकांना पाहाता येणार आहे. मालिकेतील कलाकारांनाही रिप्लेस करण्यात आले असून नावातही बदल करण्यात आलाय. 'अग्गंबाई सासूबाई’ मालिकेचे दुसरे पर्व 'अग्गंबाई सूनबाई’ येत्या १५ मार्चपासून रसिकांच्या भेटीला येत आहे.
नुकताच मालिकेचा प्रोमोही प्रदर्शित करण्यात आला आहे. प्रोमो पाहून रसिकांची पुरती निराशा झाली आहे. मालिकेत चुकीच्या कलाकारांची निवड करण्यात आल्याचे रसिकांचे म्हणणे आहे. इतकेच काय तर आशुतोष पत्कीने साकारलेली सोहमची म्हणजेच बबड्याची भूमिका अव्दैत दादरकर साकारत आहे.
तर तेजश्री प्रधानने साकारलेली शुभ्राही भूमिका उमा हृषिकेश साकारत आहे. या कलाकारांना पाहून रसिकांनी खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे. तर काहींनी मालिका नव्याने रसिकांच्या भेटीला आणण्यात अर्थ काय असे अनेक प्रश्न करताना दिसतायेत.
विशेष म्हणजे बबड्या भूमिकेत अद्वैत दादरकरचा लूक पाहून अनेकांना त्याचा सभ्य अंदाज काही रुचलेला नाहीय. पूर्वीचाच बबड्या बरा होता असेही म्हणाताना दिसतायेत. मालिकेची झलक पाहून 'अग्गंबाई सूनबाई’ कितपत रसिकांचे मनोरंजन करण्यास यशस्वी ठरणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.