OMG! अन् या अभिनेत्रीवर आली विमानतळावर तयार होण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 03:30 PM2019-12-15T15:30:00+5:302019-12-15T15:30:02+5:30
एअरपोर्टवरच्या लॉबीमध्ये मेकअप करताना दिसली अभिनेत्री...
करिना कपूर स्टाईलच्या बाबतीत कुणापेक्षाही कमी नाही. त्याचमुळे जिथे कुठे जाईल तिथे सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळतात. चुलत भाऊ अरहान जैन याच्या रोका सेरेमनीत असेच काही पाहायला मिळाले. या सेरेमनीत करिनाने शानदार एन्ट्री मारली. पण यासाठी करिनाला चक्क एअरपोर्टवर तयारी करावी लागली. होय, एअरपोर्ट घाईघाईत मेकअप करून तिला सेरेमनीला पोहोचावे लागले.
करिना बेंगळुुरू येथे एका इव्हेंटसाठी गेली होती. दुस-याच दिवशी मुंबईत अरमानची रोका सेरेमनी होती. अशात घरी जाऊन नंतर तयार होणे करिनाला शक्य नव्हते. मग काय, बेंगळुरु एअरपोर्टवरच ती तयार झाली. तिची हेअर स्टाईलिस्ट आणि मेकअर आर्टिस्टने चक्क एअरपोर्टवर करिनाला तयार केला. यादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. यात करिना एअरपोर्टवरच्या लॉबीमध्ये मेकअप करताना दिसतेय.
अरमानच्या रोका सेरेमनीत करिना लाल रंगाच्या चुडीदारमध्ये पोहोचली. सैफ अली खानही तिच्यासोबत होता. कपूर कुटुंबातील अन्य सदस्यही यावेळी हजर होते.
जुलै 2019 मध्ये अरमानने गर्लफ्रेन्ड अनीसा मल्होत्रासोबत साखरपुडा केला होता. करिश्मा कपूरने या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. अरमान हा राज कपूर यांची मुलगी रीमा जैन हिचा मुलगा आहे.
करिनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच ती ‘गुड न्यूज’ या सिनेमात झळकणार आहे. यात ती अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल. याशिवाय कियारा अडवाणी व दिलजीत दोसांज यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. आयव्हीएफ तंत्राची मदत घेत असलेल्या दोन कपल्सच्या स्पर्म्समध्ये झालेल्या अदलाबदलीनंतरचा ड्रामा या सिनेमात पाहायला मिळणार आहे.